01:24pm | Sep 21, 2020 |
(प्रकाश राजेघाटगे)
बुध: कोरेगांवमधील शिवसैनिकांत सध्या कमालीची अस्वस्थता पसरली असल्याचे वास्तव सध्या सोशल मीडियावर पहायला मिळत आहे. हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘कोरेगाव कोरे सोडू नका’ हे वाक्स सध्या शिवसैनिकांच्या तोंडी येवू लागले आहे. या वाक्याची आठवण करून देत सध्या लोकप्रतिनीधींना संदेश दिला जात आहे. कोरेगाव येथे नुकतेच कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. कोविड हॉस्पिटल उभारणीचे काम लयच भारी होती पण या कार्यक्रमाला शिवसैनिकांची मात्र उपस्थिती नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. या नाराजीचे प्रतिनिधीत्व सध्या हिंदूहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे वाक्य करताना दिसत आहे.
याबाबत सध्या सोशल मीडियावर एक मॅसेज व्हाईरल होताना दिसत आहे. तो असा की, इतिहास विसरणारे इतिहास घडवू शकत नाहीत असे सांगणारे भरपूर भेटतात पण वरील वाक्य ज्या व्यक्तीने बोलले आहे हे जर कोरेगांवातील जनतेला सांगितले तर ही जनता काय त्या पक्षातील सैनिक सुध्दा तोंड झोडून घेतील अशी वाच्यता जिल्हाभर नव्हे तर महाराष्ट्रात झाली नाही तर नवल!!!!
सदरहु वाक्य शिवसेनाप्रमुख वंदनीय शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे सन 1997 सालच्या सरस्वती विद्यालयाच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे आहे. हे जर सद्यस्थितीच्या विद्यमान गृहराज्य मंत्री यांना सांगितले तर त्यांचा विश्वास बसणार नाही कारण ते नुकतेच तेव्हा सहकार परिषदेचे अध्यक्ष झाले होते आणि ऐवढे सांगायचे कारण आज ज्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेल्या कोरेगांवच्या लोकप्रतिनिधी साहेबांनी केलेल्या कोविड सेंटरच्या उद्घाटनावेळी घडलेला प्रसंग बोलता असेच म्हणावे लागेल. शिवसैनिकांसाठी (शिवसेने साठी नव्हे बरं का!!!) शिवसेनाप्रमुखांचे कोरेगांव कोरेच राहिले आहे.
कोरेगांवचे विद्यमान लोकप्रतिनिधी खरे पाहता खूप सक्रिय आहेत हे आपण जाणत आहात.कोरोनाच्या या महामारीत त्यांनी केलेल्या कार्याची जोड जिल्ह्यात कुठल्याच तालुक्यात नाही हेही खरेच आहे. हे निर्विवाद सत्य आहे. हेही नाकारून चालणार नाही कारण सत्य परेशान होता पराभूत नहीं होता....कारण स्वखर्चाने एवढे मोठे कोविड सेंटर करणे याचा मान कोरेगांवच्या विद्यमान लोकप्रतिनिधींना जातोच. पण यात सर्वांत पक्ष म्हणून शिवसेना कोठे दिसते हे विद्यमान गृहराज्यमंत्री यांनी जरासे त्यांच्या माऊली सारख्या पक्षीय नेत्यांकडून जाणले असते ते बरं झाले असते हेच म्हणावे लागेल.
वाचक हो!!
आपणांस यात राजकीय गोष्टींचा भाग दिसत असेल तर आपणांस एवढेच सांगू इच्छितो की, राजकीय गोष्टी राजकीय व्यक्ती विसरेल ते नेते कसले हे देवगिरीकर उपनेत्याला न बोलवता सिध्द करून ह्या नेत्यांनी सांगितले आहे. हे जर सन्मानीय प्राध्यपकाला कळाले नाही तर ते त्यांच्यासाठी राजकीय आत्महत्या ठरेल म्हणा पण त्याचा बोध त्यांना कळेल तेव्हा वेळ निघून गेली असेल म्हणा....पण असो हा आजचा विषय आहे. तो शिवसेनाप्रमुखांच्या सरस्वती विद्यालय पटांगणावरील त्या सभेचा.....
कारण शिवसेनाच्या चिन्हावर निवडून आलेल्या लोकप्रितिनिधींना शिवसेना सोडून सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी कसे उपलब्ध होतात? असे विचारले तर ते सांगुच शकत नाहीत हेच खरे सत्य आहे. म्हणून तर आम्ही म्हणतो की शिवसेनाप्रमुखांचे कोरेगांव संबंधीचे वाक्य फक्त कोरेगांवातील शिवसैनिकांना कोरे सोडते असे खेदाने नमुद करावे लागते कारण कोविड सेंटरच्या उद्घाटनाला शिवसेनाचा साधा शहरप्रमुखही उपस्थित नसावी हीच शोकांतिका कोरेगांवातील शिवसैंनिकासमोर सद्यस्थितीला भेडसावत आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |