01:38pm | Sep 15, 2022 |
दिल्ली : शिधापत्रिकाधारकांवर मोठी कारवाई करत सरकारने गेल्या काही दिवसांत सुमारे अडीच कोटी शिधापत्रिका रद्द केल्या आहेत. याबाबतची माहिती शासनाकडून देण्यात आली. राज्यसभेत भाजप खासदार सुशील कुमार मोदी यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना ग्रामीण विकास आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी ही मोठी माहिती दिली.
महाराष्ट्रात 21लाखाहून अधिक शिधापत्रिका रद्द
केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीत, 2017 ते 2021 या पाच वर्षांत देशात डुप्लिकेट, अपात्र आणि बनावट 2 कोटी 41 लाख शिधापत्रिका रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. एकट्या बिहारमध्ये 7.10 लाख शिधापत्रिका रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. यादरम्यान उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 1.42 कोटी शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय महाराष्ट्र राज्यात 21.03 लाख शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत.
यावेळी सरकारने पुन्हा एक मोठे पाऊल उचलले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA), रेशनचा लाभ घेतलेल्या 70 लाख कार्डधारकांचा संशयितांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. हा डेटा केंद्राने ग्राउंड व्हेरिफिकेशनसाठी राज्यांना पाठवला आहे. पडताळणीमध्ये, ज्यांची नावे यादीत समाविष्ट झाली आहेत ते NFSA अंतर्गत रेशन मिळण्यास पात्र आहेत की नाही हे शोधून काढले जाईल.
दरम्यान, अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले की, जर 70 लाखांपैकी निम्मेही नियमानुसार योग्य आढळले नाहीत तर त्यांची जागा रद्द करून नवीन पात्रांना संधी दिली जाईल. शिधापत्रिका रद्द केल्यानंतर त्यांच्या जागी नवीन पात्र नागरिकांची नावे जोडली जातात.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |