09:13pm | Sep 23, 2021 |
सातारा : ग्रामिण भागात आठवडा बाजाराला अनन्यसाधारण महत्व आहे. कोरोनामुळे सध्या अनेक महिने आठवडा बाजार बंद आहे. सध्या बहुतांशी सर्व व्यवहार सुरु झाले आहेत. छोटया-छोटया व्यापार्यांचे आठवडा बाजार हे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असल्याने, आठवडा बाजार सुरु करण्याची मागणी जरी योग्य असली तरी आठवडाबाजारामुळे गर्दीला निमंत्रण मिळत असते. त्यामुळे आठवडा बाजार लवकरात लवकर सुरु करणेबाबत योग्य तो निर्णय घेण्याबाबत आपण संबंधीत यंत्रणेकडे आग्रह धरु असे ठोस आश्वासन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिले.
कोरेगांवच्या राजहंस प्रतिष्ठानने निवडक आठवडाबाजार व्यापार्यांसह आज सर्किट हाउस, सातारा येथे कोरेगांवचा आठवडा बाजार सुरु करणेबाबत छोटया-मोठया व्यावसायिकांचे लेखी निवेदन देवून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना विनंती केली त्यावेळी ते बोलत होते.
कोणत्याही बाजारावरच त्या- त्या भागातील आर्थिक उलाढाल अवलंबुन असते. आठवडा बाजार त्याला अपवाद नाही सध्या फक्त मास्क वापरणे, सॅनिटायझेशन, हात धुणे, गर्दी न करता व्यवहार करणे इतकेच कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचे मुख्य उपाय आहेत. तसेच सध्याची परिस्थिती हाताबाहेर जाणे कोणालाही परवडणारे नाही. दुसर्या लाटेचा फटका अनेकांना बसला आहे. गतवर्षी आणि यावर्षी मे महिन्याच्या आसपास अनेकांचे संसार कोरोनामुळे विस्कळीत झाले आहेत. अशी आर्थिक व मनुष्यहानी न परवडणारी आहे.
त्यामुळे याबाबत विचारपूर्वक आणि काही निर्बधात्मक उपाय राबवुन आठवडा बाजार सुरु करणेबाबत विचार करावा लागणार आहे. याबाबत आम्ही संबंधीत यंत्रणेला आपल्या रास्त भावना पाहोचवताना योग्य तो तोडगा काढण्याचा आग्रह धरु. पाठपुरावा करु असे ठोस आश्वासन याप्रसंगी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिले.
यावेळी जिल्हापरिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, राजहंस प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत पवार, ऍड.विनित पाटील, राजवंश आठवडे बाजार संघटनेचे आठवडा बाजार व्यावसायिक व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |