03:13pm | Oct 19, 2020 |
पुसेगाव : पदरमोड करून कोरेगाव या ठिकाणी पूर्ण सेंटर उभे करणारे शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या दानशूरपणामुळे जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कोणतीही शासकीय मदतीची वाट न पाहता आमदार महेश शिंदे यांनी स्वखर्चातून कोरेगाव या ठिकाणी श्री काडसिद्धेश्वर कोविड सेंटरची उभारणी केली. दररोजच्या लाखो रुपयांचा खर्च एकटे आमदार महेश शिंदे उचलत असून त्यांच्या कार्याला हातभार म्हणून अनेक जण पुढे येत आहेत. पुसेगाव मधील श्री सेवागिरी महाराज व्हॉट्सअप ग्रुपच्या वतीने आमदार महेश शिंदे यांच्या कार्यात खारीचा वाटा उचलण्यात आला.
श्री सेवागिरी व्हॉट्सअॅप ग्रुपचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते किरण मगर यांनी व्हॉट्सअॅपवरती महेश शिंदे यांनी सुरू केलेल्या सेंटरला मदतीचे आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेकांनी आपल्या इच्छेने मदत केली. ग्रुपमधील मदतीचा आकडा हा पंचवीस हजार रुपये झाला. किरण मगर आणि सहकार्यांनी आमदार महेश शिंदे यांना पंचवीस हजाराचा धनादेश सुपूर्द केला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते किरण मगर म्हणाले, महेश शिंदे सारखे सामाजिक जाण असणारे लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघास लाभले हे मतदारसंघाचे मोठे भाग्य आहे. कोरोनाच्या महामारीत करोडो रुपये खर्च करून मोफत श्री काडसिद्धेश्वर कोविड सेंटरची उभारणी करणारे आमदार महेश शिंदे हे देशातील दुर्मिळ उदाहरण असून अशा सामाजिक कार्यास राजकारणापलीकडे जाऊन समाजाने मदत करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी अविनाश जाधव, भरतशेठ मुळे, प्रदीपशेठ देशमुख, कुमार गुरव, प.पू.श्री. सेवागिरी महाराज व्हॉट्सअॅप ग्रुपच्या वतीने उपस्थित होते. यावेळी मदत करणार्या सर्व देणगीदारांची यादी आणि देणगीचा चेक आमदार महेश शिंदे यांना देण्यात आला.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |