05:03pm | Aug 09, 2021 |
फलटण : फलटण शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात फायनान्स कंपनीच्या रेपो बॉयजनी एका युवकाकडून जबरदस्तीने दुचाकी काढून घेवून व त्याला मारहाण करुन त्याच्या खिशातील पैसे लांबवल्याची धक्कादायक घटना घडली असून दिवसाढवळ्या रेपो बॉयजनी केलेल्या या वाटमारीमुळे फलटण शहरासह तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
याबाबत माहिती अशी, शुभम संजय जाधव (रा. मांडव खडक, ता. फलटण) हा युवक आज दुपारी सातारा येथील जंबो कोविड रुग्णालयात कोरोनाग्रस्त असलेल्या आपल्या पित्याला भेटण्यासाठी निघाला होता. संबंधित युवकाच्या पित्याला रक्ताची गरज असल्याने घरातील आईचे दागिने मोडून ते पैसे तो साताराकडे घेवून चालला होता. याचवेळी फलटण शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये फायनान्स कंपनीच्या रेपो बॉयजनी त्या युवकाची गाडी अडवून तुझ्या दुचाकीचे दोन हप्ते थकलेले आहेत,आताच्या आता ते दोन हप्ते भर, अन्यथा गाडी जमा कर, अशी धमकी दिली. यावेळी त्या युवकाने माझे वडील सातार्यातील जंबो कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना रक्ताची तातडीने गरज असल्याने मला सातार्यात पोहोचणे गरजेचे आहे, अशी विनवणी केली. तरीही रेपो बॉयजच्या हृदयाला पाझर फुटला नाही. उलट, रेपो बॉयजनी तुझा बाप मेला-जगला तरी आम्हाला काही फरक पडत नाही, असे म्हणत संबंधित युवकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. दुचाकी ताब्यात घेत असताना वडिलांच्या उपचारासाठी जमा केलेले पैसेही रेपो बॉयजनी जबरदस्तीने काढून घेतले. यावेळी अनेक विनंत्या करुनही रेपो बॉयजनी त्याला गाडी व पैसे दिले नाहीत. गाडी व पैसे काढून घेतल्याने हतबल झालेल्या युवकाने माझ्या वडिलांना वाचवा हो, असे म्हणत जागेवरच हंबरडा फोडला. यावेळी युवकावर गुदरलेल्या प्रसंग पाहून जाणारे-येणारेही हळहळले. या घटनेनंतर संबंधित युवकाने फलटण शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. परंतू फलटण शहर पोलीस ठाण्याचे कारभारी रजेवर गेल्यामुळे फलटण शहर पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांनी त्या युवकाची तक्रार ऐकून न घेताच त्याला पोलीस ठाण्यातून हाकलून लावले.
गेल्या काही महिन्यांमध्ये फलटणमध्ये फायनान्स कंपन्यांच्या रेपो बॉयजनी उच्छाद मांडलेला आहे. भरदिवसा हे रेपो बॉयज वाहनचालकांची लुटमार करतात. फलटण शहर पोलिसांचा धाक नसल्यानेच फायनान्स कंपन्यांच्या रेपो बॉयजची मुजोरी वाढली आहे. ही मुजोरी मोडून न काढल्यास भविष्यात फलटण शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. दरम्यान, फलटण शहरातील रेपो बॉयजवर कडक कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे तालुकाध्यक्ष संजय गायकवाड यांनी केली आहे.
कारभारी रजेवर, चोर आणि फायनान्सवाले रस्त्यावर...
फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे हे गेले काही दिवस रजेवर आहेत. त्यामुळे फलटण पोलीस ठाण्याची पूर्णत: घडी विस्कटलेली आहे. कालच फलटण शहरात खुनाची घटना घडलेली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या चाणाक्ष तपासामुळे आरोपींना काही तासांतच जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. आज दुपारी फायनान्स कंपनीच्या रेपो बॉयज कडून झालेली लुटमारही यातीलच प्रकार आहे. एकूणच फलटण पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. त्यामुळेच गुंडापुंडांचे फावलेले आहे. एखादा फिर्यादी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास आला तर त्याला गेटवरुनच हाकलले जाते. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी फलटण पोलीस ठाण्याची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होवू लागली आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |