02:08pm | Oct 21, 2020 |
जळगाव: भाजपावर नाराज असलेले एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपाला रामराम ठोकला आहे. खडसे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजामा दिला असून ते उद्या दुपारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकनाथ खडसे यांच्या या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपाला मोठा हादरा बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे कोणता निर्णय घेणार याबाबत तर्कविर्तकांना उधान आले होते. अखेर या सार्या तर्कविर्तकांवर पडदा पडला आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे.
भाजपाची खर्या अर्थानं वाढ करणारे एकनाथ खडसे यांनी त्यांचा पक्ष सोडल्याचं मला सांगितलं. त्यामुळे त्यांनी भाजपाचा त्याग केला आहे. खडसे शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांना काय पद देण्यात येईल वगैरे आता काही सांगता येणार नाही. त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होतोय हीच आनंदाची बाब आहे. भाजपात त्यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे त्यांनी भाजपा सोडला असून, त्यामुळेच त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात येत आहे, असं पाटील यांनी सांगितलं.
राज्याच्या राजकारणात खळबळ
महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षे चालेल, यात कसलीही शंका नाही. मी तर अनेक वेळा म्हणालोय की, हे सरकार दीर्घकाळ चालेल. पाच वर्ष ही कमी मुदत आहे. पण, बडेजाव करणार नाही. गेल्या काही दिवसात भाजपाच्या वेगवेगळ्या भागातील नेत्यांशी माझी चर्चा झाली आहे आणि त्यांची देखील राष्ट्रवादीत येण्याची इच्छा आहे. ते ज्या वेळी येतील, त्यावेळी कळेल. आपण अंधारात प्रवेश घेणार नाही. दिवसाढवळ्या घेणार आहोत, असं सांगत जयंत पाटील यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |