01:56pm | Jun 30, 2022 |
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वीच बुधवारी रात्री मुख्यमंत्रीपद आणि विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी आपल्या ट्रेडमार्क स्टाईलमध्ये म्हणजे फेसबुक लाईव्ह करत मुख्यमंत्री म्हणून जनतेशी अखेरचा संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी थोडीफार खोचक टीकाटिप्पणी वगळता अत्यंत संयतपणे आपली भूमिका मांडली. उद्धव ठाकरे यांच्या या कृतीचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक आहे. पक्षात बंडाळी माजली असताना आणि मुख्यमंत्रीपद सोडतानाही उद्धव ठाकरे यांनी आपला तोल जराही ढळून दिला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले असले तरी त्यांच्याविषयी जनमानसात सहानुभूतीची एक प्रचंड लाट निर्माण झाल्याचे चित्र आहे.
मात्र, मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतरही त्यांच्यावर टीका करणे सुरुच ठेवले आहे. अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून आपल्या भावना व्यक्त केल्या. राज साहेबांच्या विरोधात नेहमीच द्वेषाचं राजकारण करणार्या, प्रत्येक बाबतीत राज ठाकरेंचं नुकसान करणारे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्हा मनसे महाराष्ट्र सैनिकांना तिळमात्रही सहानुभूती नाही, असे अमेय खोपकर यांनी म्हटले आहे. यावर आता शिवसेनेच्या गोटातून काही प्रतिक्रिया येणार का, हे आता पाहावे लागेल.
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर राज ठाकरेंचं भाष्य
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही तिरकसपणे भाष्य केले आहे. एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो, असे राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सोहम भोईटे प्रथम |
शिंगणापूर रोडवर ट्रीपल सीट दोन दुचाकीची समोरासमोर भीषण धडक |
‘शिवसंग्राम’चे विनायक मेटे यांचे अपघातात निधन |
राकेश झुनझुनवाला यांचं निधन, शेअर मार्केटमधील बादशाह गेला! |
भटक्या विमुक्त जमाती संघटना दि. १५ ऑगस्ट रोजी काढणार झेंडा रॅली |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यांवर छापे |
दोन वेगवेगळ्या दारू अड्डयांवर छापे |
फलटण येथील जयवंत नगर परिसरात घरफोडी |
शेडमधून ३० हजार रुपये किंमतीच्या प्लेटा चोरीस |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकींची चोरी |
कंटेनर-इरटीका कार अपघातात तीनजण जखमी |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातात नुकसान केल्या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने दोन जण ठार; दोन महिला गंभीर |
नातवाने केला आजीचा डोक्यात दगड घालून खून |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यांवर छापे |
दोन वेगवेगळ्या दारू अड्डयांवर छापे |
फलटण येथील जयवंत नगर परिसरात घरफोडी |
शेडमधून ३० हजार रुपये किंमतीच्या प्लेटा चोरीस |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकींची चोरी |
कंटेनर-इरटीका कार अपघातात तीनजण जखमी |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातात नुकसान केल्या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने दोन जण ठार; दोन महिला गंभीर |
नातवाने केला आजीचा डोक्यात दगड घालून खून |
सातारा येथे वीर पत्नींचा सन्मान |
सातारा जिल्हा बँकेचा सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून सन्मानपूर्वक सत्कार! |
महाराष्ट्रात विकास कामांसाठी अठरा हजार कोटी रुपयांची मागणी : शंभूराज देसाई |
सातारा येथे केंद्रीय विद्यालयाची खा. उदयनराजे यांची मागणी |
औषध निर्माण क्षेत्रात संशोधनात्मक मनुष्यबळाची नितांत गरज |