01:28pm | Oct 20, 2022 |
दिल्ली : पंतप्रधान मोदी यंदा प्रथमच अयोध्येत शरयू तीरावर दरवर्षी होत असलेल्या दीपोत्सवात सामील होणार आहेत. मोदी यांचा हा दुसरा अयोध्या दौरा आहे. यापूर्वी करोना काळात मोदी ५ ऑगस्ट रोजी रामजन्मभूमी शिलान्यास करण्यासाठी आले होते. आता २३ ऑक्टोबर रोजी मोदी दीपोत्सवात सामील होण्यासाठी अयोध्येत येत आहेत. यावेळी ते राम मंदिर निर्माण प्रगतीचा आढावा घेतील. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षातील दिपोत्सावासाठी मोदी प्रमुख्य पाहुणे आहेत. त्यासाठी प्रशासन तयारीला लागले आहे.
पंतप्रधान राम राज्याभिषेक सोहळ्यात सुद्धा सहभागी होणार आहेत आणि शरयू आरती करणार आहेत. राम पौडीवर पणती प्रज्वलित करून ते दीपोत्सवाची सुरवात करणार आहेत. त्यावेळी आतषबाजी केली जाणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधानपदी असताना अयोध्येत येऊन रामललाचे दर्शन घेणारे मोदी पहिले पंतप्रधान आहेत. यापूर्वी पाच पंतप्रधान अयोध्येत येऊन गेले होते मात्र त्यापैकी कुणीच रामलला चे दर्शन घेतले नव्हते असे सांगितले जात आहे.
पाच पंतप्रधान अयोध्येत येऊन गेले मात्र कुणीच रामललाचे दर्शन घेतले नव्हते
इंदिरा गांधी जेव्हा अयोध्येला आल्या होत्या तेव्हा राम जन्मभूमीला कुलूप घातले गेले होते. न्यायालयाने कुलूप काढण्याचे आदेश नंतर दिले होते. इंदिराजी एकूण तीन वेळा अयोध्येला आल्या होत्या. १९६६ मध्ये शरयू पुलाचे उद्घाटन करण्यासाठी , १९७५ मध्ये महंत नरेन्द्र देव कृषी विद्यापीठाचा शिलान्यास करण्यासाठी आल्या होत्या. १९७९ मध्ये त्यांनी येथे येऊन हनुमान गढी मध्ये बजरंगबळीचे दर्शन घेतले होते. राजीव गांधी पंतप्रधान असताना १९९० मध्ये सद्भावना यात्रेत सहभागी होण्यासाठी आले होते पण त्यांनी रामललाचे दर्शन घेतले नव्हते. १९९७ मध्ये देवेगौडा यांनीही अयोध्येला ओव्हर ब्रिजचा शिलान्यास करण्यासाठी भेट दिली होती. अटल बिहारी वाजपेयी २००२ आणि २००४ असे दोन वेळा अयोध्या भेटीवर आले होते पण त्यांनीही रामललाचे दर्शन घेतले नव्हते.
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
अपघातात नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
शेंद्रे येथे अनावधानाने गोळी सुटून कामगार जखमी |
शिवसेना जिल्हाप्रमुखांनी घेतली बँक व्यवस्थापकाची झाडाझडती |
जावली तालुक्यातील आडवी बाटली उभी करणार्यांविरोधात सायरन आंदोलन |
मारहाण प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल |