07:54pm | Aug 19, 2022 |
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहर पोलिसांनी धडक कारवाई करत सहा गावठी बनावटीचे कट्टे, 30 जिवंत काडतुसांसह जवळपास 38 लाखांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी भारतीय दंडविधान कलम 34 प्रमाणे आर्म्स अॅक्ट 3/25, 7/25 अंतर्गत सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. चोपडा शहर पोलिसांनी 17 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही कारवाई केली. आरोपी गावठी कट्टे आणि काडतुसे साताऱ्यातील कराडकडे घेऊन जात होते.
17 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारासा चोपडा-शिरपूर रस्त्यावरील एस्सार कंपनीच्या पेट्रोल पंपाजवळ अवैध शस्त्र खरेदी-विक्री होणार असल्याची माहिती चोपडा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस संबंधित ठिकाणी दाखल झाले आणि चार आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून सहा गावठी बनावटीचे कट्टे, 30 जिवंत काडतूस, 4 मोबाईल फोन आणि फोर्ड एन्डेव्हर कंपनीचे चार चाकी वाहन असा एकूण 37,37000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी या प्रकरणात गणेश उर्फ सनी सुनिल शिंदे (वय 25 रा. ओगलेवाडी ता. कराड जि.सातारा), मोहसीन हनिफ मुजावर (वय 30 रा.युवराज पाटील चौक, मसुर ता.कराड जि. सातारा), रिजवान रज्जाक नदाफ (वय 23 रा. शिवाजी चौक, मलकापुर ता. कराड. जि. सातारा) आणि अक्षय दिलीप पाटील (वय 28 रा.45 रविवार पेठ, कराड जि.सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. या आरोपींनी अवैध शस्त्र खरेदी-विक्री करणारा आरोपी सुरज विष्णु सांळुखे (रा.कराड जि.सातारा) याच्या सांगण्यावरुन आरोपी सागर सरदार (रा. पारउमर्टी ता.वरला जि.बडवानी) याच्याकडून मॅग्झीनसह सहा गावठी बनावटीच्या पिस्तुल (कट्टा), 30 पिवळ्या धातुंचे जिवंत काडतूस विकत घेतले. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातील 1,20,000 रुपये किंमतीचे 6 गावठी कट्टे, 30,000 रुपये किंमतीचे 30 जिंवत काडतूस, 87000 रुपये किमंतीचे 4 मोबाईल फोन आणि 35,00,000 रुपये किमंतीची फोर्ड एन्डेव्हर कपंनीच्या गाडीसह 37 लाख 37000 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सहा आरोपी हे संगनमताने गुन्हा करत असल्याने त्यांच्याविरोधात चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम 34 प्रमाणे आर्म्स अॕक्ट 3/25, 7/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आतापर्यंत यापैकी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर दोघांचा शोध सुरु आहे.
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |