वाई : येथील भाजी मंडई परिसरात असलेला एक बिअर बार, मेडिकल, खताचे व किराणा मालाचे दुकान तसेच एक दूध डेअरी अशी पाच दुकाने चोरट्यांनी सोमवारी रात्री फोडून अंदाजे पन्नास हजारांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. अनेक महिन्यानंतर वाईत एकाच वेळी दुकाने फोडल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तीन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले असून त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे.चोवीस तासात चोरट्यांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
भाजी मंडईत असलेला शशिकांत येवले यांच्या मालकीचा आम्रपाली बिअर बार अँड रेस्टॉरंट चे मुख्य शटर चोरट्यांनी कटावणीच्या साह्याने उचकटून आत प्रवेश करून गल्ल्यात असलेले १४ हजार २०० रुपये व दोन दारूचे खंबे लंपास केले. चोरट्यांनी बार लगत असणाऱ्या सुशांत गोळे यांच्या मालकीचे साईकृपा कृषी केंद्र या खताच्या दुकानाचेही शटर उचकटून दुकानात ठेवलेली १८ हजार रुपयांची रोकड लंपास केली. तसेच बिलाल इकबाल बागवान यांच्या ही किराणामाल दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी ११ हजार रुपये रोख रक्कम गायब केली आहे. तसेच यात्री निवासाच्या समोर असलेल्या श्रीपाद मेडिकल चे शटर उचकटून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांना याठिकाणी काही मिळून आले नाही. मात्र महागणपती पुलाजवळ असणाऱ्या अष्टविनायक फार्मा या मेडिकलचे शटर उचकटून ७ हजार रुपयांची रोकड लंपास केली. यात्री निवासमध्ये असलेली रामचंद्र भाटे यांच्या भाटे डेअरीचेही शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये चोरट्यानी ३०० रुपये रोख व अठराशे रुपये किंमतीचे आईसक्रीचे बॉक्स चोरून नेले. चोरट्यांनी रात्री साडे दहा ते साडे बाराच्या दरम्यान ही सर्व दुकाने फोडल्याची माहिती समोर येत आहे. श्रीपाद मेडिकल मध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही मध्ये चोरटे शटर उघडून आत प्रवेश करतांना दिसत आहेत. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी गुरेबाजार झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या चार संशयित तरुणांना सकाळीच चौकशी साठी ताब्यात घेतले होते. तपासात त्यापैकी सनी सुरेश जाधव (वय २६), अक्षय गोरख माळी (वय २०) आणि सागर सुरेश जाधव (वय २४) सर्व रा. गुरेबाजार झोपडपट्टी, वाई या तिघांनी दुकाने फोडून चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १७ हजार रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. अवघ्या चोवीस तासात डीबी पथकाने चोरट्यांना पकडण्यात यश मिळवले आहे. अटक केलेले चोरटे सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वाई पोलिस ठाण्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |