05:34pm | Mar 02, 2022 |
फलटण : फलटण तालुका रेल्वेने जोडला गेला असून आता फलटण-मुंबई रेल्वे सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु असून फलटण-पुणे रेल्वेचे स्पीड वाढवण्याबाबत बुधवारी फलटणमध्ये बैठक झाली असून याबरोबरच मुंबई -हैद्राबाद बुलेट ट्रेन ही देखील फलटणमधील शिंदेवाडी गावापासून जाणार असली तरी ती सस्तेवाडी गावाकडून जावी व त्याचा फलटणकरांना फायदा व्हावा यासाठीही चर्चा झाली. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री यांच्याशी पत्रव्यवहारही झालेला आहे. बुलेट ट्रेन मार्गाचा सर्व्हेही पूर्ण झाला असून या रेल्वेमार्गाच्या कामासाठी एक लाख 80 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून ही मुंबई-हैद्राबाद बुलेट ट्रेन सुरु झाल्यावर केवळ 40 मिनिटात मुंबई व हैद्राबादला जाता येईल. याबाबतही बैठकी चर्चा झाल्याची माहिती माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
पंढरपूर रेल्वे मार्ग, फलटण- पुणे- मुंबई मार्गावर रेल्वे सेवा, बुलेट ट्रेन- फलटणमार्गे वळविणे याबाबत फलटण तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, फलटण-मुंबई रेल्वे करण्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली असून यावेळी फलटण-पुणे रेल्वेचा स्पीड वाढण्याबाबतही यावेळी चर्चा झाली आहे. तसेच यावेळी फलटण-बारामती रेल्वे मार्ग जलद गतीने ॲक्विजेशन करुन फलटण-बारामती रेल्वे सुरु करण्याबाबतही या बैठकीत उहापोह करण्यात आला आहे. फलटण-पंढरपूर हा जुना रेल्वे मार्ग आहे. त्या मार्गाचा आढाव घेण्यासाठी 11 मार्च रोजी बैठक घेण्याचे यावेळी ठरवण्यात आले असून फलटण-पंढरपूर रेल्वे मार्ग सुरु झाल्यावर आणखी सुविधा निर्माण होईल. याबाबत सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात आली असल्याचे खासदार निंबाळकर यांनी सांगितले.
नव्याने आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले असून मुंबई-हैद्राबाद हा देशातील अतिशय जलद गती मार्ग म्हणजे बुलेट ट्रेन म्हणतो तो माढा लोकसभा मतदार संघातून वळवत आहोत. त्या मार्गाच्या पूर्ततेसाठी लवकरच पुण्यात बैठक होणार असून आज फलटण येथे झालेल्या बैठकीत बुलेट ट्रेन बाबतही आढावा घेण्यात आला. रेल्वेचे दळणवळण या माढा लोकसभा मतदार संघातून व फलटण तालुक्यामधून सुरु झालेले आहे. फलटण ते पुणे रेल्वे सुरुच झालेली आहे. आता फलटण ते मुंबईही लवकरच सुरु होत आहे आणि बुलेट ट्रेन सुरु झाल्यानंतर प्रवाशांना फक्त 40 मिनिटात हैद्राबादला किंवा मुंबईला पोहोचता येणार आहे. यासंदर्भातील तांत्रिक सर्व्हेही पूर्ण झालेला असून बुलेट ट्रेनला रेल्वे बोर्डाची स्वीकृती मिळून जवळपास एक लाख 80 हजार कोटी रुपयांचा हा नवीन रेल्वेमार्ग मुंबई -अहमदाबादनंतर जो मुंबई ते फलटणच्या शेजारी असलेल्या शिंदेनगर आणि तेथून गुलबर्गा, पंढरपूर, अकलूजहून हैद्राबादला जाणार आहे. तो फलटणमधील सस्तेवाडी मार्गी जावा अशी लोकांची इच्छा होती. याबाबतही आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचे खासदार निंबाळकर यांनी सांगितले.
फलटण, लोणंद, पुणे रेल्वेची वेळ बदलणार
फलटण-लोणंद -पुणे ही प्रायोगिक तत्वावर सुरु झालेल्या रेल्वे फेरीबाबत नागरिक व व्यापाऱ्यांची वेळ बदलण्याची मागणी असल्याबाबत खासदार निंबाळकर यांना छेडले असता ते म्हणाले, या रेल्वेची वेळ बदलण्याबाबत फलटणच्या व्यापाऱ्यांची बैठक 11 मार्चला आयोजित केली असून या फलटण ते पुणे रेल्वेचे स्पीड वाढवणे तसेच त्याची वेळ बदलण्याबाबत व्यापारी, पत्रकार, नागरिक व प्रशासकीय अधिकारी यांची कमिटी करुन त्या बैठकीत जी वेळेची मागणी होईल त्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |