03:35pm | Jun 24, 2021 |
पुसेगाव : गेल्या कित्येक दिवसांपासून शेळ्यामेंढ्याचे बाजार बंद आहेत. राज्यसरकारने तात्काळ याप्रकरणी लक्ष घालून बाजार सुरू करावेत, अन्यथा पावसाळी अधिवेशनात मेंढरे सोडू, असा इशारा मेंढपाळ आर्मीचे महासचिव नवनाथ हणमंतराव गारळे यांनी दिला आहे.
याबाबत बोलताना नवनाथ गारळे म्हणाले, गेल्या कित्येक दिवसांपासून मेंढपाळ आर्मी शेळ्यामेंढ्याचे बाजार सुरू करा, अशी मागणी करत आहेत. तरीदेखील सरकार जाणुन बुजून दुर्लक्ष करत आहे. लॉकडाऊन अनलॉकची घोषणा करून देखील केवळ बाजार चालू नसल्याने मेंढपाळांची कोकरं व्यापारी लोक कवडीमोल भावानं खरेदी करत आहेत. सरकारला मेंढपाळांची पिळवणूक दिसणार की नाही ? असा सवालही श्री.गारळे यांनी यावेळी उपस्थित केला. मेंढपाळांच्या बाबतीत सरकार आंधळे झाले असून त्यांना मेंढपाळांची पिळवणूक दिसत नाही, असे मतही नवनाथ हणमंतराव गारळे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रातला मेंढपाळ शांत आहे. याचा चुकिचा अर्थ काढु नये. सध्या मेंढपाळ वेगवेगळ्या अनेकानेक समस्यांना तोंड देत आहे. बाजार बंद असल्याने मेंढपाळांची आवक जावक पुर्णतः बंद झाली आहे. मेंढपाळांची कोकरं पावसाळ्यात चढ्या भावाने विक्री होतात. परंतु बाजार बंद असल्याने त्यांना कवडीमोल भावाने विकावे लागत आहेत. येत्या काळात बाजार सुरू नाही झाले तर मेंढपाळ आर्मीचे राष्ट्रीय सांसद प्रमुख अर्जुन थोरात यांच्या नेतृत्वात पावसाळी अधिवेशनात मेंढरं सोडू असा इशाराही मेंढपाळ आर्मीचे महासचिव नवनाथ हणमंतराव गारळे यांनी बोलताना दिला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |