02:36pm | May 26, 2022 |
पुणे : पुणे ते पंढरपूर या पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठा, पालखी तळ, पालखी विसावा यासारख्या प्रकारची विविधे कामे येत्या १० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या दोन वर्षानंतर पायी मार्गस्थ होणार आहेत. पालखीच्या नियोजनासाठी जिल्हा प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आळंदी, देहू मंदिर संस्थानांचे पदाधिकारी, जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त ॲड. विकास ढगे-पाटील, श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख माणिक मोरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, 'पालखी मार्गावरील आवश्यक रस्त्यांची दुरुस्ती, पालखीतळ, विसावा, पाणीपुरवठा यासारखी विविध प्रकारची कामे येत्या १० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. करोना साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करण्याकडे लक्ष द्यावे. प्रांताधिकाऱ्यांच्या माध्यमातून दोन वेळा पालखी मार्गांची पाहणी करण्यात आली आहे.'
कामे पूर्ण करण्याच्या सूचना
रस्त्यांच्या साइड पट्ट्यांसह अन्य कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाणी, वीजपुरवठा करण्याची पालखी सोहळयाच्या विश्वस्तांनी सूचना केली. त्यानुसार, पाणी, वीजपुरवठा सुरळीत करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. पालखीच्या विसाव्याच्या ठिकाणी ग्रामंपचायत, नगरपालिका, तसेच बांधकाम विभागाच्या माध्यमातून दुरुस्ती, स्वच्छतेची कामे पूर्ण करण्यात येतील.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी
आरोग्य, रस्ते, सुरक्षा, भूसंपादनाबाबत बैठकीत चर्चा
पालखीच्या अनुषंगाने आरोग्य, रस्ते, सुरक्षा, तसेच भूसंपादनाबाबत या बैठकीत चर्चा झाली. आळंदीच्या देऊळ वाड्याभोवती असलेले अतिक्रमण हटवणे, सासवडजवळील पुलाचे काम पूर्ण करणे, निरेच्या जुन्या पुलावरील खड्डे बुजवणे व दुरुस्ती आदी कामे तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जेजुरीचा पालखी तळ यंदा हस्तांतरीत करण्यात आला आहे. तेथे तंबू, चौथाऱ्याबाबत काम कसे करावे याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
- अॅड. विकास ढगे, सोहळा प्रमुख, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी आजच होणार |
बाळासाहेबांची शिवसेना आम्ही गगनाला गवसणी घालण्याइतपत मोठी करु |
शुक्रवार १ जुलै २०२२ पासून लागू होणार ११ नवे नियम |
मृत कन्हैय्या लालच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी 24 तासांत 1 कोटीचा निधी |
उद्धव ठाकरे च्याविषयी जनमानसात सहानुभूतीची एक प्रचंड लाट |
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा आम्हालाही आनंद नाही, पण परिस्थितीच अशी उद्भवली |
नव्या मंत्रिमंडळात साताऱ्यातील कोणाची वर्णी लागणार |
भाजप आणि शिंदे गट यांची आधीपासूनच अलिखित छुपी युती |
उद्धव ठाकरेंनी पक्ष वाचवण्यासाठी सत्ता गमावली |
बालविवाह करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चौघांवर गुन्हे |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
4 लाख 30 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सोनके येथे सुमारे 73 हजारांची वीजचोरी; दोघांवर गुन्हे |
कराड येथून 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस |
अपघात प्रकरणी चौघांवर गुन्हे |
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा आम्हालाही आनंद नाही, पण परिस्थितीच अशी उद्भवली |
नव्या मंत्रिमंडळात साताऱ्यातील कोणाची वर्णी लागणार |
भाजप आणि शिंदे गट यांची आधीपासूनच अलिखित छुपी युती |
उद्धव ठाकरेंनी पक्ष वाचवण्यासाठी सत्ता गमावली |
बालविवाह करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चौघांवर गुन्हे |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
4 लाख 30 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सोनके येथे सुमारे 73 हजारांची वीजचोरी; दोघांवर गुन्हे |
कराड येथून 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस |
अपघात प्रकरणी चौघांवर गुन्हे |
जिल्ह्यातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण |
शेतकऱ्यांनी अद्ययावत कृषी तंत्रज्ञान आत्मसात करून शेती करावी : राहुल जितकर |
भाजपच्या महिला व युवक संपर्क प्रमुखांची पनवेल येथे बैठक संपन्न |
किर्लोस्कर पॉवर टिलर्सच्या माध्यमातून शेतीमध्ये घडवून आणत आहे क्रांती |
मलकापूर नगरपंचायतीतील निधी अपहार प्रकरणाची होणार चौकशी |