फलटण : दोन वर्षापूर्वी राज्यात सत्तांतर झाले. त्यामुळे बिळात लपून बसलेल्या फलटणमधील गुंडांना पुन्हा एकदा धुमारे फुटले असून त्यातच त्यांना ‘राजाश्रय’ मिळाल्याने त्यांनी फलटणमध्ये रोजच नंगानाच चालवला आहे. आज विद्यमान नगरसेवक तथा फलटणमधील कूप्रसिद्ध गुंड पांडुरंग गुंजवटे याने नगरपालिकेच्या आवारातच एका बांधकाम व्यावसायिकावर खंडणीसाठी जिवघेणा हल्ला केला. पीडित जखमीने खंडणीसाठी हल्ला केल्याचा जबाब देवूनही फलटण पोलिसांनी मात्र पूर्ववैमनस्यातून हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केल्याने याप्रकरणामधील ट्विस्ट वाढला आहे. याबाबत माहिती अशी, सागर सुधीर शहा (वय 36, रा. फलटण) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची फलटण शहरासह उपनगरामध्ये गृहप्रकल्पांची कामे सुरु आहेत. असे असताना सागर शहा हे कामानिमित्त फलटण पालिकेत गेले असता नगरसेवक पांडुरंग गुंजवटे (रा. मलटण), अभिजीत जानकर (रा. शुक्रवार पेठ, फलटण) यांनी शहा यांना दालनात बोलावून तुला फलटणमध्ये कामे करायची असतील तर आम्हाला 30 लाख रुपये द्यावे लागतील, असे म्हणत शहा यांना खंडणी मागितली. मात्र, शहा यांनी त्याला नकार दिल्यानंतर गुंजवटे आणि जानकर या दोघांनी मिळून सागर शहा यांच्यावर धारदार चाकू तसेच लोखंडी गजाने हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये सागर शहा गंभीर जखमी झाले आहेत. दिवसाढवळ्या नगरपालिकेच्या आवारातच फलटण पालिकेचा विद्यमान नगरसेवक व एक नामचीन गुन्हेगार एका बांधकाम व्यावसायिकाला मारहाण करीत असल्याचे चित्र आज फलटणकरांना याची देही याची डोळा बघावयास मिळाले. गेल्या काही वर्षांपासून अवैध सावकारीच्या माध्यमातून फलटणमधील कात्याभाईने फलटण तालुक्यास वेठीस धरलेले आहे. तो जिथे राहतो, त्याच ठिकाणी त्याने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नंगानाच सुरु केला आहे. सोमवार पेठेतील प्याद्यांना एकमेकांविरोधात तलवारी परजायला लावून सोमवार पेठेत कायदा व सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडविण्याचे काम केले आहे. सोमवार पेठेतील धुरळा खाली बसतो न बसतो तोच पांडुरंग गुंजवटेने आज सागर शहा यांना मारहाण करुन बार उडवून दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून पांडुरंग गुंजवटे आपल्या दुष्कृत्यामुळे चांगलाच लाईमलाईटमध्ये आला आहे. 2013 साली त्याला अनुसूचित जातीमधील एका महिलेला मारहाण व विनयभंग केल्याप्रकरणी सातारा येथील न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. दोन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत मतदारकेंद्रावर केलेल्या आगळीकीप्रकरणी त्याला पोलिसांकडून येथेच्छ चोप मिळाला होता. तसेच त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हाही दाखल झालेला आहे. सातत्याने गुन्हे दाखल होवूनही पांडु सुधारायचे नाव घेत नाही. फलटण शहराचे फळकूट दादा असणार्या अभिजीत जानकर याला बरोबर घेत त्याने आज चक्क व्हाईट कॉलर व्यावसायिकाचा 30 लाखांच्या खंडणीसाठी गळा पकडलेला आहे. सध्या तो व्यावसायिक रुग्णालयात उपचार घेत आहे. यापूर्वी फलटणमध्ये गुन्हे घडायचे, परंतू पोलीसही आपल्या पेनाच्या माध्यमातून गुन्हेगारांना दे माय धरणी ठाय करुन सोडायचे. परंतू सध्या ते होताना दिसत नाही. 2014 साली राज्यात सत्तांतर झाले. भाजप-शिवसेना सत्तेत आली. पर्यायाने फलटणमधील राज्यकर्त्यांनाही विरोधी बाकावर बसावे लागले. त्यावेळी फलटणमधील आपल्या पिलावळींना त्यांनी हातपाय न झाडण्याच्या सूचना केल्या. सूचना नाही तर ती तंबीच होती. तत्कालीन पोलीस अधिकार्यांनीही फलटणमधील पोलीस अधिकार्यांच्या पुंग्या टाईट केल्याने 2019 पर्यंत ते बिळात लपून बसले होते. परंतू राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर फलटण काय, महाराष्ट्रही आपल्याच बा चा... अशा तोर्यात फलटणमधील गुन्हेगार वावरु लागले. पांडुरंग गुंजवटेही त्यातलाच नग आहे. गेल्या 2 वर्षात त्याने मांडलेल्या उच्छादामुळे फलटणमधील सामाजिक वातावरण दूषित झाले आहे. फलटण पोलिसांत पांडुरंग गुंजवटे व अभिजीत जानकर यांनी केलेल्या या गंभीर कृत्याचा थातुरमातूर गुन्हा दाखल झाला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या सागर शहा यांनी 30 लाखांच्या खंडणीसाठीच हा प्राणघातक हल्ला झाल्याचा आरोप केलेला आहे. फलटणमध्ये दररोज गरीब, वंचित, पीडित लोकांचे दमन केले जाते. परंतू आज एका व्हाईटकॉलर व्यावसायिकावरच हल्ला झाल्याने फलटणमध्ये कायदा व सुव्यवस्था आहे काय, याचाही शोध घेणे जिल्हा पोलीस प्रमुख या नात्याने अजयकुमार बन्सल यांना गरजेचे आहे.
गरीबाला मोक्का, पांडु ला ‘टिक्का’
गेल्या काही वर्षांमध्ये अनेक गुन्हेगारांवर ताणून-दाबून मोक्के बसविण्यात आले. मोक्का कोणाला, कधी, कसा लावायचा हे पोलिसांच्या हातात असल्यामुळे अनेक राजकीय पुढार्यांनी आपल्या विरोधात चालणार्या अनेकांना मोक्का लावून त्यांचा परस्पर काटा काढला. त्यानंतर असे ताणून-दाबून लागलेल्या मोक्का केसेसवर न्यायालयाने ताशेरे ओढले. मोक्का केसेसमध्ये अनेकठिकाणी मानवाधिकाराची पायमल्ली झालेली आहे. अनेक निष्पाप, निरपराधांना ज्यापद्धतीने गव्हा बरोबर किडेही रगडले जातात, त्याप्रमाणे रगडले गेले आहे. फलटणमधील पांडुरंग गुंजवटे हा लंपट, लोचट आणि टिनपाट माणूस गेल्या काही वर्षांमध्ये मिळत असलेल्या राजाश्रयामुळे भलताच शेफारलेला आहे. त्याच्यावरही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी खोलात जावून पांडुला ‘क्वॉक’ करायचे असल्याचे त्याची गुन्हेगारी कुंडली काढून आज घडलेल्या गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यालाही मोक्क्याचा टिक्का लावावा, अशी मागणीही फलटण शहरातील सुसंस्कृत नागरिकांकडून केली जात आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |