सातरा : आजच्या धकाधकीच्या जगामध्ये वाढते वजन ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. बैठे काम, फास्ट फूड, व्यायमाचा अभाव यामुळे कमी वयातही अनेकांचे वजन प्रचंड वाढल्याचे दिसते. कंबरेभोवतीचा घेर वाढतच चालल्याने सर्वच त्रस्त असल्याचे दिसते. यावर काही घरगुती उपायही शक्य आहेत. यासाठी वेलचीचे (इलायची, वेलदोडा) पाणी पिणे फायदेशीर मानले जाते.
वजन कमी करण्यासाठी डायटेशियन नेहमीच भरपूर पाणी पिण्यास सांगतात. पाणी शरिरातील विषारी गोष्टी बाहेर टाकण्याचे काम करते. तसेच यामुळे शरिरातील पचनसंस्थाही चांगले काम करते. पचनसंस्था सुधारल्यामुळे शरिरातील मल-मूत्र बाहेर टाकण्याची प्रक्रियाही सुरळीत सुरू राहते. यामुळे शरिरातील अनावश्यक घटक बाहेर टाकले जातात.
वेलची ही प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असते. चहा, खीर किंवा मसाले बनवण्यासाठीही याचा वापर केला जातो. मात्र वजन घटवण्यासाठीही वेलची रामबाण उपाय असल्याचे दिसले. वेलचीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियमचे प्रमाण मुबलक असते. यामुळे शरिरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी वेलची फायदेशीर ठरते. वजन कमी करण्यासह वेलचीचे अन्यही अनेक फायदे आहेत.
- वेलचीमध्ये अँटी-ऑक्सिडेंटचे प्रमाण भरपूर असल्याने रक्तदाब नियंत्रणात राखण्यास मदत होते.
- वेलचीमध्ये कर्करोगाशी लढण्यास मदत करणारेही काही घटक असल्याचे एका अभ्यासातून सिद्ध झाले आहे.
- वेलचीच्या सेवनामुळे पचनासंबंधीच्या समस्याही दूर होतात.
- वेलची तोंडाची दुर्गंधी घालवण्याचेही काम करते. तोंडातील बॅक्टेरियाचा नाश करण्याचे काम वेलची करते.
- रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे कामही वेलची करते.
असे बनवा वेलचीचे पाण
वेलचीचे पाणी बनवणे अगदी सोपे आहे. यासाठी तुम्हाला पाच ते सहा वेलची सोलून त्यातील दाणे काढून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचे आहेत. सकाळी उठल्यानंतर हे पाणी गरम करून घ्यायचे. या पाण्याचे दिवसातून तीन ते चार वेळा सेवन करावे. एका दिवसात तुम्ही वेलचीचे जवळपास एक लीटर पाणी पिऊ शकता.
(टीप - कोणताही उपाय करण्यापूर्वी एकदा आपल्या डायटेशियन किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
छत्रपती शिवाजी कॉलेजची एन सी सी कॅडेट गार्गी थल सैनिक कँपसाठी दिल्लीला रवाना |
भा ज पा सातारा जिल्हा कोअर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न |
साताऱ्यासह पश्चिम भागात पाऊस |
आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्या वाचवा! |
कोंडवे येथील एका शाळकरी मुलाची आत्महत्या |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
एमडीआरटी सल्लागारांच्या क्रमवारीत टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी |
महालक्ष्मीच्या आरतीसाठी सोळा दिवे आणि 56 भोग |
बेडग ते मंत्रालय लॉंग मार्च आंदोलकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी साताऱ्यात मान्यवरांची भेट |
व्यवहारातील संवेदना समजावणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवे |
बेडग येथील कमान प्रकरणाचा रिपाईद्वारे साखळी मोर्चा काढून निषेध |