11:38am | Sep 09, 2022 |
दिल्ली : किंग विराट कोहलीनं तब्बल एक हजार दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावलं. त्यानं ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावलं. विराट कोहलीचं ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमधलं हे पहिलंच आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं 71वं शतक ठरलं. त्यानं 61 चेंडूंत 12 चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद 122 धावांची खेळी उभारली. विराट कोहलीच्या शतकाच्या बळावर भारतानं अफगाणिस्तानचा 101धावांनी पराभव केला. या शतकी खेळीसह विराट कोहलीनं अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
रोहित-राहुलचा विक्रम मोडला
भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीनं अफगाणिस्तानविरोधात शतकी खेळी करत राहुल आणि रोहित यांचा विक्रम मोडीत काढला. विराट कोहलीनं रोहित शर्माचा सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मोडीत काढला आहे. टी 20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नावावर आता सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम झाला आहे. विराट कोहलीनं 122 धावांची खेळी केली आहे. याआधी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता. रोहित शर्मानं 118 धावांची खेळी केली होती. राहुलच्या 110 धावांच्या शतकी खेळीचा विक्रमही विराट कोहलीनं मोडीत काढला आहे. विराट कोहलीच्या नावावर भारताकडून सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा विक्रम झालाय.
मार्टिन गप्टिलचा विक्रम मोडला
विराट कोहलीनं वादळी शतक झळकावत अनेक विक्रमांना गवसणी घातली. विराट कोहलीनं टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विराट कोहलीनं मार्टिन गप्टिलचा विक्रम मोडीत काढला आहे. मार्निट गप्टिलच्या नावावर 3500 धावा आहेत. विराट कोहलीच्या नावावर 3584 धावा झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3500 पेक्षा जास्त धावा करणारा विराट कोहली दुसरा भारतीय फलंदाज ठरलाय. टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा रोहित शर्माच्या नावावर आहेत. रोहित शर्माच्या नावावर 3620 धावा आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50+ धावा करणारा फलंदाज -
माजी कर्णधार विराट कोहलीनं टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक वेळा 50+ धावा करण्याचा विक्रम केला आहे. विराट कोहलीनं रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढला. विराट कोहलीनं 33 व्यांदा 50+ पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. रोहित शर्मानं आतापर्यंत 32 वेळा 50+ जास्त धावा केल्या आहेत. आशिया चषकात विराट कोहलीनं तीनवेळा 50+ पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. आशिया चषकात विराट कोहलीनं भारताकडून सर्वाधिक धावा चोपण्याचा पराक्रम केलाय.
24 हजार धावांचा विक्रम
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीनं सर्वात वेगवान 24 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. याआधी सचिन तेंडुलकरने वेगवान 24 हजार धावांचा विक्रम केला होता.
भारताकडून शतक झळकावणारे फलंदाज
टी 20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा विराट कोहली सहावा फलंदाज ठरलाय. याआधी रोहित शर्मा, केएल राहुल, सुरेश रैना, दीपक हुडा आणि सूर्यकुमार यादव यांनी शतक झळकावली आहेत. रोहित शर्मानं टी 20 मध्ये भारताकडून सर्वाधिक चार शतकं झळकावली आहेत. त्यानंतर राहुलच्या नावावर दोन शतकं आहेत.
आशिया चषकात सर्वाधिक धावा
यंदा भारताकडून आशिया चषकात सर्वाधिक धावा चोपणाऱ्या फलंदाजामध्ये विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. विराट कोहलीनं दोन अर्धशतक आणि एक शतक झळकावत यंदा आशिया चषकात सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. त्याशिवाय, 2012, 2016 मध्येही विराट कोहलीनं भारताकडून आशिया चषकात सर्वाधिक धावा चोपल्या होत्या.
पाँटिंगच्या विक्रमाशी बरोबरी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. विराट कोहलीच्या आधी सचिन तेंडुलकरचा क्रमांक लागतो. विराट कोहलीनं पाँटिंगच्या 71 शतकांची बरोबरी केली आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर 100 शतकांची नोंद आहे. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या विराट कोहलीच्या नावावर 71 शतकांची नोंद आहे.
युवकाचे अपहरण करून त्याचा खून केलेले संशयित 36 तासात रत्नागिरी येथून जेरबंद |
गर तू मेरा नही हो सका, तो किसी और का होने नहीं दूंगी... |
वाढे फाटा येथील मारेकरी ताब्यात; सूत्रधार कोण? |
दोन लाखांचे दागिने घेऊन कारागीर पळाला |
एकाची 35 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
टेस्टिंग सर्टिफिकेटच्या आमिषाने सुमारे 97 हजारांना गंडा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू |
दहावीतील मुलांनी धाक दाखवण्यासाठी चक्क क्लासमध्ये नेला कोयता |
राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा : पालकमंत्री शंभूराज देसाई |
हॉटेलमध्ये विसरलेले १४ तोळे दागिने मिळाले परत |
रेशनिंग दुकानदार केरोसिन परवानाधारक संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन |
कराडचा उड्डाणपूल पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील... |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
टेस्टिंग सर्टिफिकेटच्या आमिषाने सुमारे 97 हजारांना गंडा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू |
दहावीतील मुलांनी धाक दाखवण्यासाठी चक्क क्लासमध्ये नेला कोयता |
राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा : पालकमंत्री शंभूराज देसाई |
हॉटेलमध्ये विसरलेले १४ तोळे दागिने मिळाले परत |
रेशनिंग दुकानदार केरोसिन परवानाधारक संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन |
कराडचा उड्डाणपूल पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील... |
खानापूरच्या युवकाचा परखंदीत निर्घृण खून; वाई तालुक्यात खळबळ |
तांब्याच्या तारेची चोरी |
नोकरीच्या आमिषाने तब्बल चार लाख 99 हजाराची फसवणूक |
युवतीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल |
मध्यमवर्गीय, शेतकरी, गोरगरीबांना न्याय देणारा अर्थसंकल्प |