10:00pm | Nov 18, 2020 |
सातारा : जिल्ह्यात बुधवारी 7 बाधितांचा मृत्यू, तर 246 बाधितांची नोंद झाली. दरम्यान, 817 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला असून 1031 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
बुधवारी जिल्ह्यातील 7 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची एकूण संख्या 1 हजार 653 वर पोहोचली आहे. तसेच 246 बाधितांची नोंद झाल्याने एकूण बाधितांचा आकडा 49 हजारांचा टप्पा ओलांडत 49 हजार 297 वर पोहोचला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विविध रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 817 नागरिकांना घरी सोडण्यात आल्याने जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा 45 हजारांचा पल्ला ओलांडत 45 हजार 791 वर पोहोचला असून 1031 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
7 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये रोहोट ता. सातारा येथील 68 वर्षीय पुरुष, आर्वी ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय महिला. जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये झरे ता. आटपाडी जि. सांगली येथील 69 वर्षीय पुरुष, अंबरवाडी ता. खंडाळा येथील 65 वर्षीय पुरुष, बिदाल ता. माण येथील 52 वर्षीय पुरुष तसेच रात्री उशिरा कळविलेले विठ्ठलवाडी ता. वाई येथील 79 वर्षीय पुरुष, नंदगाने ता. जावली येथील 62 वर्षीय महिला अशा एकूण 7 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
1031 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 52, कराड येथील 54, फलटण येथील 132, कोरेगांव येथील 63, वाई येथील 52, खंडाळा येथील 92, रायगांव येथील 27, पानमळेवाडी येथील 164, मायणी येथील 15, महाबळेश्वर येथील 25, पाटण येथील 56, दहिवडी येथील 61, खावली येथील 52, तळमावले येथील 40, म्हसवड येथील 51 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 95 असे एकूण 1031 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |