02:40pm | Aug 31, 2022 |
दिल्ली : रक्तपाताशिवाय शीतयुद्धाचा अंत करणारे त्यावेळच्या सोव्हियत युनियनचे राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निधन झाले आहे. ते 91 वर्षांचे होते. मॉस्कोतील रुग्णालयाने त्यांचे निधन झाल्याचे वृत्त दिले आहे. सोव्हियत युनियन आणि अमेरिका या दोन बलशाली राष्ट्रांमध्ये वर्चस्वासाठी मोठा संघर्ष निर्माण झाला होता. या दोन राष्ट्रांनी एकमेकांवर हल्ले केले असते तर जग तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटले गेले असते. मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी कोणताही रक्तपात होऊ न देता जगाला या शीतयुद्धातून बाहेर काढले होते. गोर्बाचेव्ह यांनी शीतयुद्ध थांबवले मात्र ते सोव्हियत युनियनच्या विभाजनाला मात्र रोखू शकले नाहीत.
गोर्बाचेव्ह हे सोव्हियत संघाचे अखेरचे राष्ट्राध्यक्ष होते. गोर्बाचेव्ह यांचा जन्म 2 मार्च 1931 रोजी एका गरीब कुटुंबात झाला होता. स्टॅलिन यांच्या शासनकाळात मोठ्या झालेल्या गोर्बाचेव्ह यांनी दुसऱ्या विश्वयुद्धात जर्मनीच्या ताब्यात गेल्याने काय परीणाम होतात याचा अनुभव घेतला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर गोर्बाचेव्ह यांनी मॉस्कोतून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आणि नंतर साम्यवादी पक्षाद्वारे आपली कारकिर्द घडवली.
1985 साली गोर्बाचेव्ह यांना सोव्हियत संघाचा नेता म्हणून निवडण्यात आले होते. 1985 ते 1991 पर्यंत ते सोव्हियत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस होते. 1990 साली नोबेल समितीने गोर्बाचेव्ह यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार प्रदान केला होता. संघर्षाची जागा चर्चेने घेतली आणि यामुळे पूर्वेकडील आणि पश्चिमेकडच्या देशांमधील संबंधांत नाट्यमय परिवर्तन झाले. हत्यारांसाठीच्या स्पर्धेची जागा निरस्त्रीकरणाने घेतली. यामुळे अनेक देशांतील संघर्ष कायमचे संपुष्टात आले असं नोबेल समितीने गोर्बाचेव्ह यांना नोबेल पुरस्कार देताना म्हटले. 25 डिसेंबर 1991 मध्ये सोव्हियत संघाचे राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी टीव्हीवर प्रसारीत केलेल्या संदेशात आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. सोव्हियत संघाचे विभाजन रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला होता.
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |

वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |