06:39pm | Sep 16, 2021 |
सातारा : सातारच्या जान्हवी जयप्रकाश इंगळे हिने सुप्त बद्ध कोनासन या आसन मध्ये ८तास १३ मिनिटे २१ सेकंद स्तब्ध, काहीही हालचाल न करता स्थिर राहून तिसरा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. या विश्वविक्रमाची नोंद योगा बुक आँफ रेकाँर्ड मध्ये झाली असून नुकतेच कुरियर ने गोल्ड मेडल,सर्टीफिकेट,बँच होल्डर,टी-शर्ट आदी प्राप्त झाले.
जान्हवी या सातारा जिल्ह्यामधून योगविश्वात जागतिक विश्वविक्रम करणाऱ्या पहिल्या युवती आहेत. जान्हवी हिने या आधी सलग ५ तास १ मिनिट १७ सेकंदा स्थिर राहून सिद्धासन आसन मध्ये पहिला विश्वविक्रम केला आहे. तसेच मार्च महिन्या मध्ये महिला दिनाचे औचित्य साधून नऊवारी साडी मध्ये १ तास १९ मिनिटे ३४ सेकंदामध्ये दहा हजार वेळा तितली क्रिया करून दुसरा नवा जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित करत तो समस्त महिलांना समर्पित केला. नऊवारी साडी मध्ये योगविश्वात विश्वविक्रम करणाऱ्या पहिल्या युवती आहेत.
जान्हवी या गेली १४वर्षे योगसाधना करत असून त्या आयुष मिनिस्ट्री सर्टिफाईड योगा टिचर आहेत. इंटरनँशनल आणि काँर्पोरेट योगा ट्रेनर आहेत. त्याच बरोबर जान्हवी यांनी देशविदेशातील स्पर्धांमध्ये भाग घेऊन प्राविण्य मिळवले आहे. जान्हवी या मँराथाँन रनर हि आहेत. जान्हवी कि योगशाला याच्या त्या संस्थापक असून सर्ववयोगटासाठी आँनलाईन पद्धतीने सध्या योगवर्ग घेत आहेत. जान्हवी कि योगशाले मार्फत एप्रिल २०२० पासून आज पर्यंत कोरोना काळात सर्वांसाठी आणि कोरोना पेशेंट होम क्वाँरनटाईन, आयसोलेट पेंशेट साठी मोफत योगा सेशन घेत असून याची दखल लंडन बुक आँफ रेकाँर्डने घेतली असून लंडन बुक आँफ रेकाँर्डने कमिटमेंट सर्टिफिकेट देऊन गौरव केला आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिवसा निमित्त सामाजिक संस्था, एनजिओ, डाँक्टर, पत्रकार, आरोग्यसेवक, नर्स, पोलिस, विद्यार्थी आणि पालक अशा एक हजार लोकांना आँनलाईन मोफत योगा सेशन घेऊन योग दिवस साजरा केला. जान्हवी यांना द ग्लोबल आयकाँन आँफ इंडिया, महाराष्ट्र आदर्श युवती क्रिडा रत्न पुरस्कार, द प्राईड आँफ इंडिया, द बेस्ट योगा गुरु, महाराष्ट्र शिवरत्न पुरस्कार तामिळनाडू योग असोसेशन तर्फे योगाचारिणी अवाँर्ड, इंटरनँशनल इंस्पिरेशन वुमन अवाँर्ड, निशान ए हिंद इंटरनँशनल अवाँर्ड, क्रिडा पुरस्कार, कलाम्स स्पार्कलिंग डायमंड अवाँर्ड, आयुष मिनिस्ट्री Ycb तर्फे प्लाटिनम टिचर अवाँर्ड, वुमन्स पाँवर अँड वाँईस अवाँर्ड, अमृत संतान इंटरनँशनल अँवार्ड अशा अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे. अमेरिका, लंडन, कँनडा येथील संस्थानी देखील त्यांचा गौरव केला आहे. त्याच बरोबर इतर हि विश्वविक्रमा मध्ये त्यांनी भाग घेतला असून हायरेंज बुक, इंटरनँशनल बुक मध्ये नोंद झाली आहे. जान्हवी यांचे सर्व स्तरातून कौतक होत असून खा.श्री.छ.उदयनराजे भोसले, राजमाता आईसाहेब कल्पनाराजे भोसले, खा.श्रीनिवास पाटील, मा.नगराध्यक्षा रंजना रावत, नगरसेविका दिपाली गोडसे, राजू गोडसे, नगराध्यक्षा माधवी कदम, रचनाताई पाटील, कराड नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, कृषी बाजार समितीचे सदस्य राजेंद्र भिलारे, सर सेनापती हंबीरराव मोहिते यांचे वशंज जयाजीराव मोहिते, रविंद्र झुटिंग, राजेंद्र चोरगे, वसंतशेठ जोशी, किशोर शिंदे, दत्ता बनगर, सुनिल काटकर, चंद्रशेखर घोरपडे, योगा बुकचे फाऊँडर & सिईओ राकेश भारद्वाज, जिल्हा क्रिडा अधिकारी युवराज नाईक आदी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |