08:00pm | Jan 15, 2021 |
वाई : वाई तालुक्यात ५७ ग्रामपंचायतीसाठी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सरासरी ८२.०६ टक्के इतके मतदान झाले आहे.तालुक्यातील ५९९ उमेदवारांचे भवितव्य वोटिंग मशीनमध्ये बंद झाले आहे. सर्वत्र मतदान सुरळीत व शांततेत पार पडले असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.रात्री उशिरापर्यंत १५०मतदान केंद्रावरील मतदान यंत्र पोलिस बंदोबस्तात वाईतील नवीन प्रशासकीय इमारतीत आणण्यात आली. दरम्यान सोमवारी मतमोजणी होणार आहे.
शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून सर्व मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरवात झाली. सकाळी साडेदहा वाजेपर्यंत सर्वच ठिकाणी मतदान केंद्रावर मतदारांचा ओघ कमी होता. अकरा नंतर मात्र मतदान केंद्रावर मतदाराच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. पसरणी, बावधन, ओझर्डे, सुरुर,या मोठ्या गावात दुपारपर्यंत ५५ टक्क्यांच्या वर मतदान झाले होते. दुपारी साडेतीन वाजता तालुक्यातील मतदानाची सरासरी टक्केवारी ही ६९.९४ टक्के इतके झाले होते. त्यामध्ये बाबधन मध्ये चार ते साडेपाच या वेळेत आणखी मतदान वाढल्याने एकूण मतांची टक्केवारी ही ८2.०६ टक्के इतकी झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व मतदान केंद्रावर सोशल डिस्टनसिंग पाळण्याच्या सूचना मतदारांना केल्या होत्या. मास्क शिवाय मतदान करण्यासाठी कोणालाही सोडले जात नव्हते. पश्चिम भागातील आसरे येथील १०२ वर्षाच्या आजोबांनीही आज आपल्या मतदानाचा हक्क बाजवला. विशेष म्हणज आज त्याचा वाढदिवस आहे.
५७ ग्रामपंचायतीतील ५९९ उमेदवारांचे भविष्यात मतदान यंत्रात बंद झाले असून मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीत कोणाची लॉटरी लागणार ?यांची उत्सुकता वाढली आहे.सद्यस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी या दोन पक्षांची बहुतांशी ठिकाणी सत्ता आहे. या दोन पक्षातच आजही सत्तासंगर्षं पहायला मिळत असताना सेना भाजप ही मैदानात उतरल्याने निवडणूकत रंगत आली आहे. बावधन मध्ये तर सेना- भाजप एकत्र लढत आहेत. त्यामुळे बावधनच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान निवडणुकीसाठी प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताताधिकारी संगीता चौगुले- राजपुरकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार रणजित भोसले यांनी निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी नियोजनबद्ध निवडणूक प्रक्रिया राबवली होती. एक दिवस अगोदर सर्व मतदान केंद्रावर नियुक्ती अधिकारी, कर्मचारी व पोलिस यांना मतदान यंत्रासोबत पाठवले होते. तत्पूर्वी सर्व नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना एक दिवस मतदानाचे ट्रेनिंग दिले गेले होते. मतदानासाठी राखीव पथके सज्ज ठेवण्यात आली होती. मतदान यंत्रात अचानक बिघाड झाला तर अतिरिक्त यंत्र ही ठेवली गेली होती. वाई व भुईंज पोलिसांचा मोठा फौजफाटा ही सर्व मतदान केंद्रावर तैनात करण्यात आला होता. दिवसभरात कुठे ही मतदान यंत्रात बिघाड अथवा अनुचित प्रकार घडला नाही. सर्वत्र मतदान सुरळीत व शांततेत पार पडल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत ५७ ग्रामपंचायतीच्या सीलबंद मतदान यंत्र पोलिस बंदोबस्तात प्रशासकीय इमारतीत आणली गेली आहेत. त्याठिकाणी ही सशस्त्र पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
प्रचारासाठी सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर...
प्रचार अधिक दर्जेदार व आकर्षक व्हावा यासाठी उमेदवारांनी शोशल मीडियाला वाढती पसंती दिली, व्हिडीओ चित्रफीत, गाणी, होर्डिंग्ज, शेरो शायरी हे फेसबुक, इन्स्टाग्राम व व्हाट्सएपच्या माध्यमातून मतदारांना मोहात पडण्याचा नवा ट्रेंड तरुणाई मधून पाहायला मिळाला. विशेषतः ग्रामपंचायत निवडणुकीत तरुणांचा उत्साह अधिक प्रमाणात दिसून आला.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |