10:13am | Jan 27, 2022 |
कराड : किरपे, ता. कराड येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात काल बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे. 26 जानेवारी रोजी पहाटे ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर वनविभागाने तात्काळ बिबट्याला ताब्यात घेत अन्यत्र हलवले आहे.
येथील मौवटी नावाच्या शिवारात नारायण मंदिराजवळ वनविभागाने लावलेल्या पिंजर्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. त्यानंतर वनविभागाने घटनास्थळी ग्रामस्थ विद्याधर देवकर, आनंदा देवकर, ठाणे पोलीस पाटील प्रवीण तिकवडे यांना बोलावून बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला असल्याचे दाखवले. त्यानंतर इतर ग्रामस्थांना याबाबतची कल्पना येण्याआधीच ग्रामस्थांचा उद्रेक टाळण्याच्या हेतूने वनविभागाने बिबट्याला अन्यत्र हलवले आहे.
दरम्यान, गुरुवारी २० रोजी सायंकाळी किरपे येथील शेतात बिबट्याने राज धनंजय देवकर या ५ वर्षाच्या चिमुरड्यावर हल्ला केला होता. यावेळी त्यांचे वडील धनंजय देवकर यांनी प्रसंगावधान दाखवत बिबट्याला प्रतिकार केल्याने ते बिबट्याच्या तावडीतून मुलाचा प्राण वाचवण्यात यशस्वी झाले.
त्यानंतर वनविभागाने तात्काळ हालचाली गतिमान करत परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. मात्र, बिबट्याने पिंजऱ्याला एक-दोन वेळा गुंगारा दिल्याचे दिसून आले. बिबट्याने लहान मुलावर हल्ला केल्याच्या दोन दिवसानंतरच परिसरात शनिवार दि. 22 रोजी ऊसतोड मजुरांना बिबट्याचे पुन्हा दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे वनविभागाने लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत होती.
अखेर बुधवार दि. 26 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. त्यानंतर वनविभागाने ग्रामस्थांना याचा सुगावा लागण्याआधीच ग्रामस्थांचा संभाव्य उद्रेक टाळण्याच्या हेतूने तात्काळ बिबट्याला अन्यत्र हलवले आहे. दरम्यान, बिबट्या जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी ही सुटकेचा निश्वास सोडला आहे.
साताऱ्यात पोलिसांवरच आंदोलन करण्याची वेळ |
अविनाश भोसलेंना अटक झाली; जिल्ह्यातील हस्तक अधिकार्यांना कधी? |
पुणे-महाबळेश्वर बसमध्ये सापडली बंदुकीची गोळी |
शाहूनगर येथे लोकवर्गणीतून बसवले जाणार सीसीटीव्ही कॅमेरे |
गोडोली जकात नाका परिसरातील हातगाडे पालिकेने केले जप्त |
रणसिंगवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण जाधव, व्हाईस चेअरमनपदी सुभद्रा पोतेकर बिनविरोध |
राजापूर सोसायटीच्या चेअरमनपदी जयवंतराव डंगारे, व्हाईस चेअरमनपदी दादा लवंगारे बिनविरोध |
गोळीबाराने हादरली अमेरिका ! |
सांगवी येथे जुगार अड्ड्यावर छापा : एकावर गुन्हा |
भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, विजय आमचाच होणार |
छत्रपतींचा सन्मान नव्हे, स्वपक्षाचा संकुचित विचार केला |
जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे आवाहन |
पालखी मार्गावर १० जूनपर्यंत कामे पूर्ण करा |
केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईत हस्तक्षेप होता कामा नये |
राज्यसभा निवडणुक : संभाजीराजे छत्रपती अर्जही भरणार नाहीत ? |

परबांसोबत शिवसेनेचे यशवंत जाधव अडचणीत |
गुणवंत विद्यार्थ्यांनी गौरीशंकरची शैक्षणिक प्रतिमा उंचविली : श्रीरंग काटेकर |
महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांची तब्बल २.४४ लाख पदे रिक्त |
रस्ता अडविल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा |
महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |