09:31pm | Jan 25, 2022 |
कराड : भारत हा जगात सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय घटना अंमलात आली. तेव्हापासून सर्वांना मतदानाचा समान अधिकार मिळाला असून या अधिकाराचा वापर नव मतदारांनी जागृतपणे करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन नायब तहसिलदार आनंदराव देवकर यांनी केले.
येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात मंगळवारी २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार जागृती दिन संपन्न झाला. याप्रसंगी, प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी युवराज पाटील, विरकर साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, रजिस्ट्रार आर.वाय. गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
नायब तहसिलदार देवकर म्हणाले, नवीन मतदार नोंदणीमध्ये तालुक्यात सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याबद्दल या महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या प्रयत्नांचेच हे यश असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
युवराज पाटील म्हणाले, १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व उमेदवारांनी मतदार यादीत नाव नोंदवणे महत्वाचे आहे. मतदान हा आपला पवित्र अधिकार आहे. या अधिकाराचा योग्य वापर करून लोकशाही बळकट करण्याचे काम मतदारांनी करावे. यासाठी शासनाने मतदान फॉर्म ऑनलाईन भरण्याची सोय केली असून पोर्टल हेल्पलाईन आणि गरुड अॅप सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, महाविद्यालयाचे प्राचार्य, तिन्ही शाखाचे उपप्राचार्य, ज्युनिअर महाविद्यालयाचे उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर सेवक व सर्व विद्यार्थ्यांना मतदानाची प्रतिज्ञा देण्यात आली. प्रतिज्ञेचे वाचन एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. तानाजी पाटील यांनी केले. डॉ. अभय पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी एन.एस.एस. व एन.सी.सी. स्पोर्टस विभाग आणि वूमेन्स मिलीटरी अॅकडमीचे विद्यार्थी उपस्थित होते.
शिवथरला नऊ महिन्याचे अर्भक मृतावस्थेत आढळल्याने खळबळ |
आता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी होणार |
साताऱ्यात पोलिसांवरच आंदोलन करण्याची वेळ |
अविनाश भोसलेंना अटक झाली; जिल्ह्यातील हस्तक अधिकार्यांना कधी? |
पुणे-महाबळेश्वर बसमध्ये सापडली बंदुकीची गोळी |
शाहूनगर येथे लोकवर्गणीतून बसवले जाणार सीसीटीव्ही कॅमेरे |
गोडोली जकात नाका परिसरातील हातगाडे पालिकेने केले जप्त |
रणसिंगवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण जाधव, व्हाईस चेअरमनपदी सुभद्रा पोतेकर बिनविरोध |
राजापूर सोसायटीच्या चेअरमनपदी जयवंतराव डंगारे, व्हाईस चेअरमनपदी दादा लवंगारे बिनविरोध |
गोळीबाराने हादरली अमेरिका ! |
सांगवी येथे जुगार अड्ड्यावर छापा : एकावर गुन्हा |
भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, विजय आमचाच होणार |
छत्रपतींचा सन्मान नव्हे, स्वपक्षाचा संकुचित विचार केला |
जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे आवाहन |
पालखी मार्गावर १० जूनपर्यंत कामे पूर्ण करा |

केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईत हस्तक्षेप होता कामा नये |
राज्यसभा निवडणुक : संभाजीराजे छत्रपती अर्जही भरणार नाहीत ? |
परबांसोबत शिवसेनेचे यशवंत जाधव अडचणीत |
गुणवंत विद्यार्थ्यांनी गौरीशंकरची शैक्षणिक प्रतिमा उंचविली : श्रीरंग काटेकर |
महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांची तब्बल २.४४ लाख पदे रिक्त |