05:54pm | Nov 24, 2020 |
बुध : खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील नेर धरणाच्या उजव्या कालव्यातून सोमवारी सायंकाळी रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले. पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाची कृष्णा सिंचन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी २४ तासातच अंमलबजावणी केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी नेर धरणातील पाणी रब्बी हंगामासाठी सोडण्यात यावे, या मागणीचे निवेदन रविवारी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना दिले होते. पालकमंत्र्यांनी कृष्णा सिंचन विभागाला त्वरित पाणी सोडण्याचे आदेशही दिले होते. सोमवारीही त्यांनी अधिकाऱ्यांना याबाबत सुचना दिल्या. सिंचन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्वरित हालचाली करुन २४ तासाच्या आत पालकमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी केली. सोमवारी सायंकाळी नेर धरणाच्या उजव्या कॅनॉलमधून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले.
सोडण्यात आलेले पाणी भांडेवाडी, खटाव, हुसेनपूर आणि सिध्देश्वर कुरोलीपर्यंत जाणार आहे. गेल्यावर्षी कुरोलीच्या पुढील आठ किलोमीटर कॅनॉलची स्वच्छता केली असल्याने यावर्षी कुमठेपर्यंत पाणी पोहचविले जाणार आहे. रब्बी हंगामासाठी वेळेत पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे.
प्रसिद्धी माध्यमांनी नेरचे पाणी वेळेत सोडण्यासाठी आवाज उठवला होता. प्रदीप विधातेंनी पालकमंत्र्यांकडे तशी मागणी केली आणि कागदी घोडे न नाचवता, बैठकांचा फार्स न करता यावर्षी वेळेत पाणी सोडण्यात आले आहे.
आता शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरुन सहकार्य करावे...
पाणी सोडण्याची मागणी करताच पालकमंत्र्यांच्या आदेशाने रब्बी हंगामासाठी नेरचे पाणी सोडण्यात आले आहे. आता शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज आणि पाणीपट्टी भरुन कृष्णा सिंचन विभागाला सहकार्य करावे. वेळेत पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
- प्रदीप विधाते,
उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा.
'जनकल्याण' व 'तीर्थक्षेत्र' आघाड्यांच्या राजकीय आखाड्यात, विषय समित्यांच्या निवडी प्रशासनाच्या कचाट्यात |
जीएसटी भवन कार्यालयाचे उद्घाटन |
खासगी सावकाराच्या भूमिकेतून मुख्यमंत्र्यांनी बाहेर पडावे |
सहा लाख रुपयांची फसवणूक |
जिहे येथून दुचाकी लंपास |
मारहाण प्रकरणी पाचजणांवर गुन्हे दाखल |
मोळाचा ओढा येथे जुगार अड्डयावर छापा |
पोवई नाका येथे अपघातात एक जखमी |
विवाहितेच्या जाचहाट प्रकरणी 9 जणांवर गुन्हे |
गळफास घेतल्याने एकाचा मृत्यू |
कुख्यात गुंड दिपक मसुगडे हद्दपार |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हे |
दारुच्या नशेत विषारी औषध प्राशन |
पाल येथील श्री खंडोबा यात्रा रद्द |
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने बालिका दिन व मतदार दिन कार्यक्रम संपन्न |
मारहाण प्रकरणी पाचजणांवर गुन्हे दाखल |
मोळाचा ओढा येथे जुगार अड्डयावर छापा |
पोवई नाका येथे अपघातात एक जखमी |
विवाहितेच्या जाचहाट प्रकरणी 9 जणांवर गुन्हे |
गळफास घेतल्याने एकाचा मृत्यू |
कुख्यात गुंड दिपक मसुगडे हद्दपार |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हे |
दारुच्या नशेत विषारी औषध प्राशन |
पाल येथील श्री खंडोबा यात्रा रद्द |
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने बालिका दिन व मतदार दिन कार्यक्रम संपन्न |
चुकीच्या पद्धतीने कर्ज वसुली करणार्यांना आवरा |
डिसेंबर अखेरचे त्रैमासिक विवरण पत्र ईआर-1 ऑनलाईन सादर करावे |
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन |
विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास कारवाई करणार : सहा.आयुक्त नितीन उबाळे |
जिल्हयातील दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |