करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या आजाराचा संसर्ग होऊ नये, यासाठी लोकांकडून स्वच्छता बाळगणे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम देखील पाळले जात आहे. शिवाय, करोना व्हायरसपासून (Covid-19) संरक्षण व्हावं यासाठी हँड सॅनिटायझरचाही प्रचंड प्रमाणात वापर केला जात आहे. अधिक सावधगिरी बाळगण्यासाठी लोक थोड्या-थोड्या अंतरानं सॅनिटायझरचा उपयोग करून हात स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक ठिकाणी साबण - पाण्यानं हात स्वच्छ धुणे अशक्य आहे. यामुळे खबरदारी म्हणून हँड सॅनिटायझरचा वारंवार वापर होत आहे. आपल्याला हँड सॅनिटायझरचा वापर करण्याचा सल्ला सरकारकडूनच देण्यात आला आहे. पण याचा नियमित प्रमाणापेक्षा जास्त उपयोग केल्यास आरोग्यावर दुष्परिणाम (Side Effects Of Hand Sanitizer) देखील होऊ शकतात.
शरीरातील निरोगी बॅक्टेरियांचाही होतो खात्मा
सूक्ष्म जीवजंतूंचा खात्मा करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करणं प्रचंड उपयुक्त ठरते आणि यामुळेच कोणत्याही आजारांचा संसर्ग होण्यापासून आपलं संरक्षण होतं. पण याची एक दुसरी बाजू देखील आहे. सॅनिटायझरमधील घटकांमुळे आपल्या शरीरात असलेल्या निरोगी बॅक्टेरियांवरही (Microbiomes) वाईट परिणाम होऊ शकतो. हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं योग्य नाही. जे बॅक्टेरिया आपल्या शरीरासाठी लाभदायक आहेत, सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे ते देखील नष्ट होतात. खबरदारी म्हणून हात स्वच्छ धुण्यासाठी साबण आणि पाणी उपलब्ध नसल्यासच सॅनिटायझरचा वापर करावा.
घातक बॅक्टेरियांची निर्मिती
रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्रानुसार, अँटी- बॅक्टेरियल घटकयुक्त असणाऱ्या हँड सॅनिटायझरमुळे कित्येकदा अँटी-बायोटिक रेझिस्टंट बॅक्टेरियांची (प्रतिरोधक जीवाणू) निर्मिती होऊ शकतो. या बॅक्टेरियांची निर्मिती होऊ नये यासाठी सॅनिटायझर ऐवजी साबण आणि पाण्यानं हात स्वच्छ धुवावे.
करोनाचा प्रसार कसा होत आहे?
प्रकार 1 : करोना व्हायरसग्रस्त रुग्ण खोकल्यावर त्याच्या खोकल्यातून द्रव स्वरूपातले तुषार हवेत पसरतात. त्या तुषारांमध्ये हे अतिसूक्ष्म विषाणू लाखोंच्या संख्येत असतात. अशा वेळेस त्याच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींच्या श्वासातून ते विषाणू त्यांच्या श्वसनमार्गात जातात आणि ते बाधित होतात.
प्रकार 2 : आजारग्रस्त व्यक्तीच्या खोकल्यातले तुषार आणि त्यातले विषाणू आजूबाजूंच्या वस्तूंवर पडतात. खुर्ची, टेबल, दरवाजा इत्यादी. यांसारख्या पृष्ठभागांवर विषाणू बराच काळ जिवंत राहतात. अशा पृष्ठभागांना निरोगी व्यक्तीनं स्पर्श केला आणि त्यानं स्वतःच्या चेहरा, नाक, तोंडाला हात लावल्यास त्यालाही विषाणूंचा संसर्ग होतो. हे धोके टाळण्यासाठी हात स्वच्छ धणे आवश्यक आहे.
घाणेरडे हात स्वच्छ होत नाहीत
घाणेरडे हात किंवा एखाद्या गोष्टीनं माखलेले हात हँड सॅनिटायझरच्या वापरामुळे स्वच्छ होत नाहीत. घाणेरड्या हातावरील बॅक्टेरिया नष्ट करण्यास हे तितके प्रभावी ठरत नाही.
हात स्वच्छ कसे धुवावे?
किमान २० सेकंद हातांना साबण किंवा सॅनिटायझर हातांना चोळावे.
हात स्वच्छ धुण्याचे आठ टप्पे
- दोन्ही तळहात - बोटांमधील जागा - दोन्ही हातांची मागील बाजू - अंगठ्यांच्या तळाची आतील-बाहेरील बाजू - बोटांची बाहेरील बाजू - नखे - मनगटे - शेवटी हातावरील साबण पूर्णपणे निघून जाईपर्यंत हात स्वच्छ धुणे.
हात होतात कोरडे
नियमित हँड सॅनिटायझरचा वापर केल्यास आपले हात कोरडे पडतात. यावरील नैसर्गिक ओलावा कमी होतो. कारण यामध्ये असणारे अल्कोहोल त्वचा प्रचंड कोरडी करते. हात कोरडे होऊ नयेत, यासाठी हँड मॉइश्चराइझरचा वापर करावा.
हात केव्हा धुवावेत?
-सर्दी, खोकला, उलट्या, जुलाब होणे यांसारख्या साथीच्या आजारांमध्ये हात स्वच्छ धुवावे. - स्वयंपाकाला करताना आणि करून झाल्यानंतर - आजारी व्यक्तीला भेटण्यापूर्वी आणि भेट झाल्यानंतरही - शौचालयाचा वापर केल्यानंतर - घर स्वच्छ केल्यानंतरही हात स्वच्छ धुवावे.
विषबाधा होण्याचा धोका
हँड सॅनिटायझर चुकून तोंडामध्ये गेल्यास अनेक गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. अल्कोहोल असल्यामुळे विषबाधा होऊ शकते. विशेषतः लहान मुलांना याचा अधिक धोका होण्याची भीती असते. यामुळे मुलांपासून हँड सॅनिटायझर दूर ठेवावे. करोना व्हायरच्या साथीमध्ये स्वतःला वाचवायचे असेल तर हात धुणे आवश्यक आहे. पण साबण आणि पाणी उपलब्ध असल्यास हँड सॅनिटायझरचा वापर करणं टाळा. एखाद्या गोष्टीचा मर्यादित प्रमाणात वापर केल्यास त्यापासून फायदे मिळतात. पण कोणत्याही गोष्टीच्या अतिवापराचे दुष्परिणाच होतात.
छत्रपती शिवाजी कॉलेजची एन सी सी कॅडेट गार्गी थल सैनिक कँपसाठी दिल्लीला रवाना |
भा ज पा सातारा जिल्हा कोअर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न |
साताऱ्यासह पश्चिम भागात पाऊस |
आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्या वाचवा! |
कोंडवे येथील एका शाळकरी मुलाची आत्महत्या |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
एमडीआरटी सल्लागारांच्या क्रमवारीत टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी |
महालक्ष्मीच्या आरतीसाठी सोळा दिवे आणि 56 भोग |
बेडग ते मंत्रालय लॉंग मार्च आंदोलकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी साताऱ्यात मान्यवरांची भेट |
व्यवहारातील संवेदना समजावणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवे |
बेडग येथील कमान प्रकरणाचा रिपाईद्वारे साखळी मोर्चा काढून निषेध |