04:18pm | Nov 25, 2020 |
सांगली: सोन्याचा भाव आलेल्या वाळूसाठी मुजोर वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. सांगलीतील तासगाव येथील कूपर ओढ्याच्या परिसरात एक संतापजनक घटना घडली आहे. वाळू उपसा रोखण्यासाठी आणि वाळूमाफियांविरोधात कारवाईसाठी गेलेल्या महिला तहसीलदाराला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. शनिवार दि.22 रोजी दुपारी घडलेल्या प्रकारानंतर संतापाची लाट उसळली आहे.
याबाबत तासगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहेे. अनिकेत अनिल पाटील (रा. पुणदी रोड, तासगाव) याच्यासह आणखी एका अनोळखी हल्लेखोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तासगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तासगाव शहरापासून जवळच असलेल्या कपूर ओढ्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू असल्याची माहिती तहसीलदार कल्पना ढवळे यांना मिळाली होती. माहितीची खात्री करून त्या शनिवारी दुपारी एकच्या सुमारास कर्मचार्यांसह कपूर ओढ्यावर पोहोचल्या. यावेळी एका पिकअप वाहनात अवैधरित्या वाळू भरण्याचे काम सुरू होते. तहसीलदार ढवळे यांनी उपस्थितांना काम थांबवण्याची सूचना केली. वाहन जप्तीची कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अनिकेत पाटील आणि त्याच्या सहकार्याने तहसीलदारांच्या कारवाईला विरोध केला.
सरकारी कामामध्ये अडथळा आणून त्यांनी वाळूने भरलेले पिकअप वाहन बेदरकारपणे चालवत तहसीलदारांच्या दिशेने आणले. अंगावर वाहन घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच बाजूला झाल्याने तहसीलदार बचावल्या. स्वतःचा बचाव करताना जमिनीवर पडल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या. याबाबत तहसीलदार ढवळे यांनी मंगळवारी रात्री उशिरा तासगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अनिकेत पाटील याच्यासह त्याच्या सहकार्यावर गुन्हा दाखल केला.
पिकअप- दुचाकी धडकेत दोघे जखमी |
त्रिमली येथून गॅस सिलेंडर लंपास |
जिहे नजिक अपघातात एक जखमी |
ट्रकमधून 18 लाख रुपयांची वेलची लंपास |
बेदरकारपणे कार चालविणार्या एकावर गुन्हा |
सातारा येथे चेन स्नॅचिंगप्रकरणी दोघांवर गुन्हे |
विवाहाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार |
सातार्यात जुगार अड्ड्यावर छापा |
जिल्ह्यात दारु अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यात तिघांची गळफास घेवून आत्महत्या |
बांधकाम भवन बाहेर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला |
पिसाळलेला कुत्रा चावल्याने दोघांचा मृत्यू |
अंबेदरे येथे मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हे |
नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात जयंती साजरी |
जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा येथे चेन स्नॅचिंगप्रकरणी दोघांवर गुन्हे |
विवाहाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार |
सातार्यात जुगार अड्ड्यावर छापा |
जिल्ह्यात दारु अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यात तिघांची गळफास घेवून आत्महत्या |
बांधकाम भवन बाहेर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला |
पिसाळलेला कुत्रा चावल्याने दोघांचा मृत्यू |
अंबेदरे येथे मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हे |
नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात जयंती साजरी |
जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
उस उत्पादकांना सर्वाधिक नफा मिळण्यासाठी शेती अधिकार्यांनी तत्पर रहावे : ना. बाळासाहेब पाटील |
68 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |
डंपरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू |
'जनकल्याण' व 'तीर्थक्षेत्र' आघाड्यांच्या राजकीय आखाड्यात, विषय समित्यांच्या निवडी प्रशासनाच्या कचाट्यात |
जीएसटी भवन कार्यालयाचे उद्घाटन |