12:19pm | Sep 03, 2022 |
मुंबई : ऑनलाइन फूड ऑर्डरचं मार्केट आज जवळपास ८ अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचलं आहे. या व्यवसायात Swiggy आणि Zomato यांची जणू एकाधिकारशाहीच निर्माण झाली आहे. या दोन अग्रगण्य फूड डिलिव्हरी अॅप्सची हिच एकाधिकारशाही आता रेस्टॉरंट मालकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. कारण दोन्ही अॅप्सकडून वाढत्या कमीशनमुळे रेस्टॉरंट मालक वैतागले आहेत. त्यामुळे हॉटेल मालक आता स्विगी, झोमॅटोसोबतचे करार मोडण्याच्या विचारात आहेत.
आता रेस्टॉरंट मालकांनी एकत्र येऊन स्विगी, झोमॅटोवरुन माघार घेतली तर काय होईल याचा विचार करा. घरबसल्या फूड ऑर्डर करणं जवळपास अशक्य होऊन जाईल. पण एक पर्याय जेव्हा बंद होतो तेव्हा दुसरा पर्याय चाचपडून नक्कीच पाहिला जातो. त्यामुळे यावर पर्यायी मार्ग शोधण्याच्या भूमिकेत रेस्टॉरंट मालक आहेत.
पाच वर्षांपू्र्वी Swiggy आणि Zomato चं कमीशन जवळपास १२ टक्के इतकं होतं. २०१९ पर्यंत हे कमीशन २० टक्क्यांपर्यंत पोहोचलं आणि सध्या सरासरी हे कमीशन २५ टक्के इतकं झालं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कमीशन देऊन व्यवसाय करणं रेस्टॉरंट मालकांना शक्य नाही. कारण कच्च्या मालाच्या किमतीत वाढ होऊनही ते अत्यंत स्पर्धात्मक बाजारपेठेत खाद्यपदार्थांच्या किमती वाढवू शकत नाहीत. तितकी वाढ करणे आवश्यक आहे. कमिशनमुळे रेस्टॉरंटच्या जेवणाच्या आणि ऑनलाइन दरांमध्ये ६० टक्क्यांपर्यंत फरक आहे. जेफरीजच्या अहवालानुसार, ८० टक्के रेस्टॉरंट्स एग्रीगेटर प्लॅटफॉर्मवर डाइन-इन म्हणजेच हॉटेल मेन्यूपेक्षा ६० टक्के जास्त किमती सांगत आहेत. अग्रीगेटरकडून कमीशनमध्ये वाढ करण्यात आल्यानं आम्हालाही पदार्थांच्या किमती वाढवाव्या लागत आहेत, असं रेस्टॉरंट मालकांचं म्हणणं आहे.
नवे स्टार्टअप मैदानात
वाढत्या कमीशनमुळे जे रेस्टॉरंट्स Swiggy आणि Zomato पासून दूर जात आहेत ते नव्या स्टार्टअप फूड डिलिव्हरी अॅप्सना पसंती देत आहेत. थ्राइव्ह आणि डॉटपे सारख्या नव्या स्टार्टअप अॅप्सना पसंती मिळू लागली आहे. जे अत्यंत कमी ५ ते ६ टक्क्यांच्या कमीशनवर काम करत आहेत. हे स्टार्टअप्स आता Swiggy आणि Zomato ला पर्याय म्हणून उदयास येऊ लागले आहेत. स्विगी आणि झोमॅटोच्या वाढत्या कमीशनमुळे नाराज झालेले रेस्टॉरंट मालक आता नव्या प्लॅटफॉर्मच्या दिशेनं पसंती देत आहेत.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |