08:52pm | Nov 19, 2020 |
सातारा : मोटर सायकल चोरी, दरोड्यातील व अपहरणाच्या गुन्ह्यातील तीन वेगवेगळ्या आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिलेल्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यातील फरारी व पाहिजे असलेले आरोपी तसेच मोटर सायकल चोरीतील आरोपींना पकडण्या करिता विशेष मोहीम राबवण्यात आली होती. त्यानुसार आज दिनांक 19 रोजी सहायक पोलीस निरिक्षक आनंदसिंग साबळे यांनी पोलीस पथके तयार करुन जिल्ह्यात पाठविली व स्वत: पोलीस पथकासह सातारा शहर परिसरात पेट्रोलिंग करित असताना त्यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद असलेला अपहरणाच्या गुन्ह्यातील 2016 पासुन फरारी असलेला आरोपी पोवई नाका परिसरात येणार आहे. मिळालेल्या बातमीप्रमाणे त्या आरोपीस सापळा लावुन पकडण्यात आले.
दुसर्या घटनेत दिनांक 18 रोजी फरारी व पाहिजे असलेले आरोपी पकडण्याच्या मोहीमेच्या अनुषंगाने एक पथक वडुज पोलीस ठाणे हद्दीत रवाना करण्यात आले होते. या पथकाने वडुज पोलीस ठाणे कडील सन 2013 पासुन दरोड्याच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीस सापळा लावुन पकडले आहे.
तिसर्या घटनेत दिनांक 16 रोजी सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मोटर सायकल चोरीतील आरोपी हा पाचवड परिसरात येणार असल्याचे गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाल्याने त्यास सापळा लावुन मोटर सायकलसह पकडण्यात आले आहे. वरिल तिन्ही आरोपींना गुन्हयाचे तपासकामी सातारा शहर पोलीस ठाणे, सातारा तालुका पोलीस ठाणे व वडुज पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे. या तिन्ही आरोपींची नावे अनुक्रमे प्रशांत सुनिल बिसुरे (वय 29, रा.खावली ता.जि.सातारा.), राजकुमार नारायण नाईक (वय 35 रा.उंब्रज ता.कराड जि.सातारा.), जीवन साहेबराव पवार (वय 29 रा.सानपाने ता.जावळी जि.सातारा.) अशी आहेत.
या कारवाईत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक आनंदसिंग साबळे, पोलीस अंमलदार ज्योतीराम बर्गे, पोलीस हवालदार अतिष घाडगे, संतोष पवार, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, नितिन गोगावले, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, प्रमोद सावंत,निलेश काटकर, मुनिर मुल्ला, अमित सपकाळ, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, संकेत निकम, यांनी सहभाग घेतला होता.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |