09:32pm | May 25, 2022 |
सातारा : सातारा पालिकेच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम रंगकर्मींसाठी राज्यस्तरीय कैलासवासी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादा महाराज करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा शुक्रवार दिनांक 27 ते रविवार दिनांक 29 मे रोजी पालिकेच्या छत्रपती शाहू कला मंदिर येथे होणार आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील तीस संघांना निमंत्रित करण्यात आले आहे. यंदा एकांकिका स्पर्धेचे पाचवे वर्ष आहे.
या एकांकिका स्पर्धेसाठी यावर्षी सातारा, सांगली, कोल्हापूर, महाड, चंद्रपूर, मुंबई, कल्याण, पुणे, औरंगाबाद इत्यादी शहरातून दर्जेदार एकांकिका पाहण्याच्या संधी सातारकर नाट्यरसिकांना उपलब्ध झाली आहे. पालिकेच्या वतीने प्रशासक आणि पालिका मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी ही माहिती पत्रकारांना दिली
या संदर्भात पालिकेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की, खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्याच्या नाट्यचळवळीला अधिक गती देण्याच्या हेतूने या एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या एकांकिका स्पर्धेत सांघिक तसेच अभिनय, दिग्दर्शन, लेखन, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत, रंगभूषा, वेशभूषा, आणि बालकलावंत अशा विविध विभागातून एकूण 36 पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघाला करंडक आणि 25 हजार रुपये रोख, द्वितीय क्रमांकाला 20000, तृतीय क्रमांकाला 15000 आणि चतुर्थ क्रमांकाला दहा हजार अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. एकूण दीड लाख रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.
सातारकरांना या एकांकिकेच्या निमित्ताने मोफत या स्पर्धा पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. या नाट्य सादरीकरणाचा सातारकरांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी अभिजित बापट व स्पर्धा समन्वयक माजी नगरसेवक कल्याण राक्षे यांनी केले आहे.
फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी आजच होणार |
बाळासाहेबांची शिवसेना आम्ही गगनाला गवसणी घालण्याइतपत मोठी करु |
शुक्रवार १ जुलै २०२२ पासून लागू होणार ११ नवे नियम |
मृत कन्हैय्या लालच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी 24 तासांत 1 कोटीचा निधी |
उद्धव ठाकरे च्याविषयी जनमानसात सहानुभूतीची एक प्रचंड लाट |
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा आम्हालाही आनंद नाही, पण परिस्थितीच अशी उद्भवली |
नव्या मंत्रिमंडळात साताऱ्यातील कोणाची वर्णी लागणार |
भाजप आणि शिंदे गट यांची आधीपासूनच अलिखित छुपी युती |
उद्धव ठाकरेंनी पक्ष वाचवण्यासाठी सत्ता गमावली |
बालविवाह करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चौघांवर गुन्हे |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
4 लाख 30 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सोनके येथे सुमारे 73 हजारांची वीजचोरी; दोघांवर गुन्हे |
कराड येथून 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस |
अपघात प्रकरणी चौघांवर गुन्हे |
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा आम्हालाही आनंद नाही, पण परिस्थितीच अशी उद्भवली |
नव्या मंत्रिमंडळात साताऱ्यातील कोणाची वर्णी लागणार |
भाजप आणि शिंदे गट यांची आधीपासूनच अलिखित छुपी युती |
उद्धव ठाकरेंनी पक्ष वाचवण्यासाठी सत्ता गमावली |
बालविवाह करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चौघांवर गुन्हे |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
4 लाख 30 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सोनके येथे सुमारे 73 हजारांची वीजचोरी; दोघांवर गुन्हे |
कराड येथून 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस |
अपघात प्रकरणी चौघांवर गुन्हे |
जिल्ह्यातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण |
शेतकऱ्यांनी अद्ययावत कृषी तंत्रज्ञान आत्मसात करून शेती करावी : राहुल जितकर |
भाजपच्या महिला व युवक संपर्क प्रमुखांची पनवेल येथे बैठक संपन्न |
किर्लोस्कर पॉवर टिलर्सच्या माध्यमातून शेतीमध्ये घडवून आणत आहे क्रांती |
मलकापूर नगरपंचायतीतील निधी अपहार प्रकरणाची होणार चौकशी |