03:17pm | Apr 18, 2021 |
पुसेगाव : मागील काही दिवसांपुर्वी सोशल मीडियावर पुसेगांव काटकरवाडी येथील वायरमन संदीप वाघ यांची विद्युत शाँक व्हिडिओ क्लिप फिरत आहे. या घटनेला एक महिना पूर्ण झालेला आहे. दैव बलवत्तर म्हणून ऐनवेळी समांतर डीपीवरील विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे संदीप वाघ या वायरमनचे प्राण वाचले. पण या घटनेला जबाबदार असलेले लाईनमन आवळे व शाखा अभियंता मेनकुदळे, विभागीय अभियंता राक्षे अजुनही मोकाट फिरत असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पुसेगांव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राम जाधव यांनी या प्रसिद्धीप्रत्रकाव्दारे केली.
याबाबत पुढे बोलताना राम जाधव असे म्हणाले की, वीज मंडळाच्या मुजोर कारभारावर सामान्य जनता नाराज आहे. वाढीव बील पाठवून वीज भरणा करावा यासाठी सामान्य नागरिक व शेतकरी यांच्यावर दबाव टाकण्यात येत आहे. वीजबील कमी करुन न देता थेट वीज तोडीचा मार्ग अवलंबिला जात आहे. कोरोना व अवकाळी पाऊस यामुळे सामान्य जनतेचे आर्थिक गणित अगोदर बिघडलेले असताना वीज मंडळाच्या या सुलतानी कारभारावर सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. यावर आवाज उठवला असता वीज मंडळाच्या अधिकारी वर्गाने शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांच्यावर कलम ३६३ अंतर्गत दरोडा व अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पण स्वतःच्या अधिकार्यांचा चुकीमुळे एका वायरमनचा मुत्यु झाला असता, ही जबाबदारी कोणाची हे सांगण्यास वीज मंडळ टाळाटाळ करत आहे असेच दिसून येत आहे. या क्लिपमध्ये स्वतःचे काम असतानाही लाईनमन यांनी वीज तोडणी तोडण्यासाठी वायरमनला डिपीवर चढविण्यात आले आहे व "तो वायरमन मेला तरी चालेल" असे भावनाशून्य वक्तव्य म्हणजे मानवतेचा पराभव आहे असे म्हटले तर वावगे ठरू शकणार नाही आणि असे अधिकारी उजळ माथ्याने समाजात कसे काय फिरू शकतात, अशी विचारणाही यावेळी सामान्य नागरिकांतून होत आहे. म्हणून अशा अंग चोरून काम करणार्या, कर्तव्यहीन अधिकारी वर्गावर कलम ३०२ अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून ठोस कारवाई प्रशासनाने करावी, अशी मागणी राम जाधव यांनी सरतेशेवटी केली आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |