03:22pm | Nov 25, 2020 |
(प्रकाश राजेघाटगे)
बुध: खटाव पंचायत समिती शिक्षण विभागाच्या शिष्यवृत्ती पॅटर्नने सातारा जिल्ह्यासह राज्यातील असणार्या पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा समोर आदर्श निर्माण केला आहे. पं.स.पदाधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि लोकसहभाग त्याच्या माध्यमातून खूप मोठी शैक्षणिक चळवळ उभी राहिली आहे. याचे फलित म्हणून गेली तीन ते चार वर्षाच्या कालावधीत शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवी आणि आठवीचे विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान मिळवत आहेत.
सन 2016-17 मध्ये खटाव तालुक्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी संख्या 143 तर गुणवत्ता यादीत येणार्या विद्यार्थ्यांची संख्या 9 होते. आता तो आलेख कित्येक पटीने वाढला आहे. खटाव पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या शिष्यवृत्ती पॅटर्नच्या या अभिनव उपक्रमामुळे इंग्रजी माध्यमातील शेकडो विद्यार्थी प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांमध्ये प्रवेश घेतात. याचेसर्व श्रेय तत्कालिन गटशिक्षणाधिकारी लक्ष्मणराव पिसे, मुख्याध्यापक व शिक्षकांना जाते. गतवर्षी इयत्ता 8 च्या राधिका इंगळे हिने शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यात प्रथम तर यावर्षी इयत्ता पाचवीच्या प्रतीक काळे याने राज्यात द्वितीय क्रमांकाचे स्थान मिळवले आहे.
खटाव तालुका शिक्षण विभागात अग्रेसर राहावा यासाठी सर्व राजकीय मंडळीनी एकत्र येत शिक्षण विभागाकडे विशेष लक्ष दिले. त्यानंतर तत्कालीन गटशिक्षणाधिकारी लक्ष्मणराव पिसे, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी एकत्रित येऊन आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर शिष्यवृत्ती पॅटर्न राबविण्यासंबंधी मायक्रोप्लॅन तयार केला. या शैक्षणिक क्रांतीला बळ मिळाले ते खर्या अर्थाने लोकसहभागाचे. शिक्षकांच्या या विधायक कार्याला जि.प., पं.स. पदाधिकारी, प्रत्येक गावाोगावच्या ग्रामस्थांनी मागे पुढे न पाहता एकदिलाने साथ देऊन शासकीय निधी, लोकवर्गणी व वस्तुरुपी प्रत्यक्षात मदत केली. जमा केलेल्या रक्कमेतून प्रथम शाळांचा कायापालट झालेला आहे. बहुतांशी शाळेतील इमारतींच्या भिंतीवर सुंदर आणि देखणी चित्रे रेखाटलेली आहेत. सुसज्ज अशी अद्यावत डिजीटल क्लासरूम आहेत. प्रत्येक वर्ग खोल्यातील चित्रे अगदी मुलांच्या भाव विश्वातील वाटतात. सर्व वर्ग खोल्यांमध्ये आरसा, वीज, पंखे आणि बैठक व्यवस्थेसाठी बेंच आहेत.
शाळेला सर्व साधनांनीयुक्त प्रयोगशाळा आणि सुसज्ज असं ग्रंथालय आहे. तसेच इतर भौतिक सुविधाही निर्माण करण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. भौतिक सुविधांनंतर शिक्षकांनी मोर्चा वळविला तो आनंददायी शिक्षणाबरोबर शिष्यवृत्ती पॅटर्नकडे. विद्यार्थ्यांना साध्या व सोप्या भाषेत वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवून आधुनिक शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. त्याचबरोबर विविध प्रकारचे बौध्दिक विकसनाचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची बौध्दिक पातळी उंचावण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकांनी अधिकचा वेळ देऊन काम करीत असतात. या नाविण्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थी गुणवत्तापूर्ण घडू लागले. त्याला जोड मिळाली ती ई-लनिंग, कॉम्प्युटर, एल.सी.डी प्रोजेक्टरची. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्याचे काम प्रभावीपणे केले जाते. यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्व स्पर्धा व स्वच्छ सुंदर उपक्रमशील शाळा या स्पर्धांमध्ये खटाव तालुक्याने चांगले यश संपादन करीत असतो. खटाव तालुक्यातील 247 पैकी 247 शाळा डिजिटल झालेले आहेत.
पहिल्या टप्प्यातील आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षण या उपक्रमांत सर्वच घटकांनी झोकून देऊन काम केल्याने यश प्राप्त झाले. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी लक्ष्मणराव पिसे यांनी पावले उचलली ती शिष्यवृत्ती पॅटर्नकडे. शिक्षण विभागाकडून वेळोवेळी शिक्षकांसाठी उदबोधन वर्गाचे आयोजन केले जाते. अभ्यासक्रम वेळेत पुर्ण करणेसंदर्भात वर्षाच्या सुरुवातीस नियोजन केले जाते. वर्षाभरातील घटकांनुरुप सराव परिक्षा व पुर्ण अभ्यासक्रमावरील सराव परिक्षा तसेच मुख्य परिक्षेच्या अगोदर परिक्षा परिषद पुणे यांच्या धर्तीवर (अभिरुप परिक्षेचे) आयोजन केले जाते. या परिक्षेचा सर्व खर्च पं.स., शिक्षण विभाग व मुख्याध्यापक संघ करीत असतो. या परिक्षेमुळे विद्यार्थ्यांची अचूक तयारी करुन घेतली जाते. त्या परिक्षेचा निकाल ऑनलाईन पध्दतीने पालकांपर्यंत पोहचवला जातो. या अचूक नियोजनामुळे राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये सातत्याने 150 पेक्षा जास्त विद्यार्थी दरवर्षी यशस्वी होत आहेत.
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची शाही मिरवणूक
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना आणि स्पर्धा परीक्षेला कशा पद्धतीने सामोरे जावे, याकरिता शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती पॅटर्नकडे अधिक लक्ष देऊन काम करत आहेत. याचे फलित म्हणून गेली तीन वर्षाच्या कालावधीत शेकडो विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक व राज्याच्या गुणवत्ता यादीत येतात. अशा विद्यार्थ्यांचा पंचायत समिती व व शिक्षण विभागाच्यावतीने ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांची घोड्यांवरुन शाही मिरवणूक काढली जाते. जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकार्यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र, फेटा, शाल आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात येतो. जि. प. चे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर हे न चुकता या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहत होते. हा गुणगौरव कार्यक्रम इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
सर्वांच्या प्रयत्नामुळे यश..!
सध्या शैक्षणिक प्रवेश असो की नोकरीसह प्रत्येक क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. या स्पर्धेत ग्रामीण भागातील विध्यार्थी कमी पडू नयेत. यासाठी खटाव पंचायत शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती पॅटर्न तयार केला. या उपक्रमात संपूर्ण वर्षभराचे अत्यंत सखोलपणे नियोजन केले जाते. त्यानुसार मुख्याध्यापक, शिक्षकांनी अधिकचा वेळ देऊन काम केल्याने गेली तीन ते चार वर्षात खटाव तालुक्यातील विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत येत आहेत. परिणामी खटाव तालुक्यातील विद्यार्थी स्पर्धेत कुठेही कमी पडताना दिसत नाहीत.
- लक्ष्मणराव पिसे, तत्कालीन गटशिक्षणाधिकारी
सन इ. 5 वी इ. 8 वी एकूण विद्यार्थी राज्यात आलेले विद्यार्थी संख्या 2016-17 79 64 143 9 2017-18 82 78 160 12 2018-19 95 82 177 16 2019-20 68 88 156 19 चौकट पुर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत खटाव तालुका सन 2017-18 व 2018-19 मध्ये राज्यात इयत्ता 8 वी प्रथम, इयत्ता 5 वी द्वितीय, सन 2019-20 मध्ये इयत्ता 5 वी व 8 वी राज्यात द्वितीय स्थान मिळवले आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |