01:51pm | Feb 11, 2022 |
नवी दिल्ली : देशभरात सध्या कर्नाटकमधील हिजाब वादावर राजकारण सुरू झालं आहे. कर्नाटकच्या उडुपीमधल्या एका महाविद्यालयाने मुस्लीम मुलींना हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश नाकारल्यानंतर हा वाद सुरू झाला. यासंदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयाने “या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत विद्यार्थ्यांनी धार्मिक पेहरावाचा आग्रह करू नये”, असे निर्देश दिल्यानंतर हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं आहे. या मुद्द्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने आपली भूमिका स्पष्ट केली असून योग्य वेळी आम्ही हस्तक्षेप करू, असे न्यायालयानं सांगितले आहे.
शुक्रवारी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार देत न्यायालयाने आपली भूमिका मांडली. कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र त्यावर सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला.
या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय योग्य वेळी हस्तक्षेप करेल. या गोष्टी राष्ट्रीय पातळीवर पसरवू नका. आम्ही योग्य वेळीच यामध्ये हस्तक्षेप करू, असे सरन्यायाधीश एन. व्ही. रमना यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आपल्याला यावर काहीही बोलायचे नाही, असे देखील सरन्यायाधीश यावेळी म्हणाले. “मला आत्ता यावर काहीही बोलायचं नाही. ही गोष्टी व्यापक स्तरावर नेऊ नका. कर्नाटकमध्ये आणि कर्नाटक उच्च न्यायालयात काय सुरू आहे हे आम्हालाही माहिती आहे. तुम्हीही यावर विचार करायला हवा की हा मुद्दा दिल्लीपर्यंत (सर्वोच्च न्यायालय) आणणे योग्य आहे की नाही”, अशा शब्दांत सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांना फटकारलं आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशांमध्ये प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत धार्मिक पेहरावाचा आग्रह न करण्याचे निर्देश दिले आहेत. याला आव्हान देणारी याचिका काही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर सरन्यायाधीशांनी आपली भूमिका मांडली.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |