कराड : काल रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे गोटे-मूंढे गावानजीक पुणे-बंगलोर महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. महामार्गावरील अनेक सर्विस रोड पाण्याखाली गेले आहेत. गोटेनजीक महामार्गावर आलेल्या पाण्यात एक कार वाहून गेली असुन चालक थोडक्यात बचावला आहे. महामार्ग वाहतूक पोलिस अधिकारी, तहसिलदार अमरदीप वाकडे यांनी या ठिकाणची पाहणी केली.
दरम्यान तहसिलदार अमरदीप वाकडे यांनी गोटेनजीक सर्व्हिस रोडवर साचलेल्या पाण्याची पाहणी करीत रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्यांना सूचना दिल्या. यावेळी गोटे, मूंढे ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. ओढ्यावरील केलेला रस्ता व त्यामूळे येणार्या अडचणी यावेळी ग्रामस्थांनी सांगितल्या. यानंतर तात्काळ जेसीबी मशिन आणून अनेक ठिकाणी तूंबलेल्या पाण्याचा निचरा करण्यात आला. खा.श्रीनिवास पाटील यांच्या निवास्थानापासून येणारा ओढा हायवे खालून पूढे नदीकडे गेला असुन सर्विस रोडलगतच्या एका गॅरेज जवळ तूंबलेल्या पाण्याला जेसिबीच्या मदतीने वाट करुन देण्यात आली.
रात्रभर पडत असलेल्या पावसाने महामार्गा परिसरातील ओढे नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. गोटे नजीक महेंद्र हाॅटेल समोरील दोन्हीही सर्व्हिस रोडवर पाणी आले असुन विट भट्टी नजीक पाच महिन्यापूर्वी ओढ्यावर केलेल्या रस्त्यामूळे पाण्याची फूगवटा मागे आल्याने पहाटे महामार्गावर पाणी आले. याचवेळी साधारण साडेपाच वाजता इचलकरंजी येथून शिरवळकडे जाणारी डिझायर कार चालकाला महामार्गावरील पाण्याचा अंदाज न आल्याने हायवेवरून ओढ्याच्या दिशेने वाहत गेली, तात्काळ कारचालक प्रदीप जाधव गाडीतून बाहेर आल्याने सूदैवाने बचावले गेले. त्यानंतर सातारा बाजूकडे जाणार्या सर्व चारचाकी लहान वाहने अन्य ठिकाणाहून सर्व्सिसरोडवरून सातारा बाजूकडे सोडण्यात येत होती, तर अवजड वाहने महामार्गावर आलेल्या पाण्यातूनच जात होती.
महामार्ग वाहतूक पोलिस अधिकारी अस्मिता पाटील, कराड वाहतूक शाखा प्रमूख सरोजिनी पाटील यांनी आपल्या कर्मचार्यांच्या मदतीने वाहतूक सूरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. महामार्गावरील पाणी कमी झाल्यानतंर लहान चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली. साडे बारा वाजता महामार्गावरील पाणी पूर्णपणे वाहून गेल्याने मार्ग मोकळा झाला.
दरम्यान वाहून गेलेली डिझायर कार अद्याप ओढ्याच्या नजीक अडकली असुन पाणी कमी झाल्यानंतरच गाडी काढण्यात येणार आहे. महामार्ग देखभाल दूरूस्तीचे कर्मचारी दस्तीगीर आगा व त्यांचे सहकारी ठिकठिकाणी तैनात असून वाहतूकीला येणारा अडथळा दूर करत आहेत.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |