जगदलपूरः छत्तीसगडमधील बीजापूरच्या तर्रेम भागातील जोनागुडाच्या डोंगरांमध्ये नक्षलवाद्यांनी जवळपास 700 जवानांना घेरून तूफान हल्ला केला. शनिवारी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद झाले. यातील काही जवानांचे मृतदेह हाती आले आहेत. या चकमकीत अनेक जवान बेपत्ता आहेत. 4 तास ही चकमकत चालली. या चकमकीत 9 नक्षलवादीही ठार झाले. तर जवळपास 32 जवान जखमी झाले आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शहीद जवानांबद्दल शोक व्यक्त करत कुटुंबीयांबद्दल सहवेदना व्यक्त केली. यासोबच पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी नक्षलवाद्यांना गंभीर इशाराही दिला. जोनागुडाच्या डोंगरांमध्ये नक्षलवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर शुक्रवारी रात्री सीआरपीएफ चे कोब्रा कमांडो, सीआरपीएफ बस्तरिया बटालियन आणि स्पेशल टास्क फोर्सच्या दोन हजार जवानांनी नक्षलवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरू केली होती. पण नक्षलवाद्यांनी 700 जवानांना घेरत तीन बाजूंनी त्यांच्यावर तुफान गोळीबार केला. नक्षलवाद्यांनी जवानांची दोन डझनहून अधिक शस्त्र लुटली आहेत.
घटनास्थळी 180 नक्षलवाद्यांशिवाय कोंटा एरिया कमेटी, पामेड एरिया कमेटी, जगरगुंडा एरिटा कमेटी आणि साबागुडा एरिया कमेटीचे जवळपास 250 नक्षलवादीही होते. नक्षलवादी दोन ट्रॅक्टरमध्ये मृतदेह घेऊन गेल्याची माहिती आहे, असं पोलीस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी सांगितलं.
नक्षलवादी हल्ल्यात शूर जवानांनी बलिदानाची आहुती दिली. त्यांचं बलिदान हा देश विसरणार नाही. शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत आपल्या सहवेदना आहेत. आम्ही शत्रूला विरोधात कारवाई सुरूच ठेवू, असा गंभीर इशारा अमित शहांनी नक्षलवाद्यांना दिला आहे. तसंच छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना सर्वतोपरी मदतीचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.
नक्षलवादी हल्ल्यात जखमी झालेल्या 7 जवानां प्रकृती आता चांगली आहे. पण अद्याप 21 जवान बेपत्ता आहेत आणि त्यांच्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. मला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोन आला आहे. सीआरपीएफचे डीजीही छत्तीसगडमध्ये आहेत. मी आज संध्याकाळी छत्तीसगडला रवाना होतोय, अशी माहीती मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिली. ते सध्या गुवाहाटीमध्ये आहेत.
नक्षलवाद्यांनी सरकारसमोर 17 मार्चला शांततेचा प्रस्ताव ठेवला होता. जनतेच्या भल्यासाठी छत्तीसगड सरकारसोबत चर्चेसाठी तयार आहोत, असं म्हणत नक्षलवाद्यांनी चर्चेसाठी तीन अटी ठेवल्या होत्या. सशस्त्र दलांना हटवणं, नक्षलवादी संघटनांवरील बंदी हटवणं आणि तुरुंगात कैद नेत्यांना सोडण्याची मागणी त्यांनी केली होती.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |