03:57pm | Sep 14, 2020 |
टोकियो: जपानच्या पंतप्रधानपदावरून शिंजो आबे पायउतार झाले असून, लवकरच योशिहिदे सुगा यांच्या खांद्यावर ही जबाबदारी येणार आहे. योशिहिदे सुगा हा एका शेतकर्याचा मुलगा आहे, त्यांचे वडील स्ट्रॉबेरीची लागवड करीत असत. सुगा सध्या जपान सरकारमध्ये मुख्य कॅबिनेट सचिव आहेत. ते शिंझो आबे यांचे विश्वासू आहेत, आबेंचा वरदहस्त असल्यानं नवीन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सुगा यांचं नाव आघाडीवर होते. अखेर त्यांनाचा जपानचे पंतप्रधानपद भूषवण्याचा बहुमान मिळणार आहे.
योशिहिदे सुगा जपानमधील नवे पंतप्रधान असतील, अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. आज म्हणजेच 14 सप्टेंबर रोजी जपानच्या सत्ताधारी पक्षामध्ये नवीन नेत्याच्या निवडणुकीवर मतदान झाले. सुगा यांनी ही निवडणूक जिंकली आहे. एलडीपीने आपला नवीन नेता निवडल्यानंतर पुन्हा बुधवारी जपानच्या संसदेत मतदान होईल, जिथे बहुसंख्य आकडा असल्याने एलडीपीच्या नेत्याने जिंकणे अपेक्षित आहे. यानंतर विजेत्या व्यक्तीचा पंतप्रधानपदी राज्याभिषेक केला जाईल. सध्याच्या जपानच्या संसदेची मुदत सप्टेंबर 2021पर्यंत आहे.
सुगांचा जन्म जपानमधील अकिता येथे झाला. तेथे हायस्कूलचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते टोकियोमध्ये गेले. सीएनएनच्या अहवालानुसार येथे पोटापाण्यासाठी त्यांना पुठ्ठा(कार्डबोर्ड) कारखान्यात काम करावे लागले व कधीकधी त्यांना मासे बाजारात मासे विकावे लागत होते. खरं तर सुगा कामाबरोबरच विद्यापीठात शिकत होते, नोकरी करून विद्यापीठाची फी भरण्यास त्यांना मदत मिळायची.
सुगा आणि आबे 2012पासून एकत्र आहेत. सुगा आता शिंजो आबेंचा उजवा हात मानला जातो. जपानमध्ये सुगा हा एक व्यावहारिक नेते मानले जातात आणि त्यांच्याबद्दल अशी धारणा आहे की, ते पडद्यामागे राहून निर्णय घेतात.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |