07:33pm | Nov 25, 2020 |
सातारा : दि. 25 रोजी येथील वाढे फाटा येथे पिकअप वाहन चालकास मारहाण करून जबरदस्तीने लुटणार्या तीन चोरट्यांना ताब्यात घेण्यात तालुका पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून एक दुचाकी, गुन्ह्यात वापरलेले शस्त्र व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. अधिक अंकुश पवार (वय 27), सुयश अशोक जाधव (वय 19, दोघेही राहणार सैदापुर, ता. सातारा) अशी त्यांची नावे आहेत. त्यामध्ये तिसरा विधिसंघर्ष बालक आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दिनांक 21 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाढे ता. सातारा गावच्या हद्दीत सेवा रस्त्यावर एक पिकअप वाहन थांबले असताना दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी लोकांनी पिकअप वाहन चालकास चाकूचा धाक दाखवून, त्यास मारहाण करून त्याच्याकडील 3 हजार रुपये घेऊन पळून गेले होते. त्याबाबत अविनाश किसन शेळके (रा. विरोबा वस्ती, लोणंद) यांनी याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याबाबत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी तत्काळ या गुन्ह्याचा तपास करून चोरट्यांना पकडण्याच्या सूचना तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हांकरे यांना दिल्या होत्या. हंकारे यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला सूचना केल्या होत्या.
याबाबत तपास करून माहिती प्राप्त करून एका युवकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. अधिक तपासामध्ये त्याने अन्य दोन साथीदारांसमवेत गुन्हा केल्याची कबुली केली. तद्नंतर त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनीही गुन्ह्याची कबुली केली. त्यांच्याकडून रोख रक्कम व दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस हवालदार दादा परिहार, पोलीस नाईक सुजित भोसले, निलेश जाधव यांनी सहभाग घेतला.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |