08:50pm | Jan 24, 2023 |
सातारा : सातारा शहरालगत वाढे फाटा येथे कार मध्ये बसलेल्या जोडप्यातील अमित भोसले (वय 38, रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांचा गळा चिरुन फायरिंग करत मर्डर केला. प्राथमिक माहितीनुसार सुमारे 3 राऊंड फायर झाले असून हल्ल्यानंतर संशयित पसार झाले. दरम्यान, महिला सुरक्षित असून सातारा पोलीस त्यांच्याकडे चौकशी करत आहेत.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, ही घटना सोमवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अमित भोसले हे वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होते. तसेच त्यांची पत्नी सातारा पोलिस दलात महिला पोलिस म्हणून सेवा बजावत आहेत. सोमवारी रात्री अमित भोसले हे सातार्यातील एका महिलेसोबत कार मध्ये बसले होते. अमित हात धुण्यासाठी कार मधून खाली उतरल्यानंतर दबा धरून बसलेल्या एकाने अमित वर फायरिंग केले. अमितवर सुमारे 3 राऊंड फायर झाले असून यामध्ये अमित यांनी स्वत: बचाव करण्याचा प्रयत्न केला. यानंतर मात्र संशयितांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला चढवला. या घटनेत त्यांच्या गळ्यावर वर्मी घाव बसला असून त्यात ते रक्ताच्या थारोळ्यात पडले.
फायरिंग सुरू होताच कारमधील महिला, परिसरातील हॉटेल व्यवसायिक, पान टपरी चालक घाबरून गेले. हल्लेखोर पळून गेल्यानंतर कार मधील महिला खाली उतरली. यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पो. नि. विश्वजित घोडके यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. मृताच्या नातेवाईकांना पोलिसांनी माहिती दिल्यानंतर अमित यांच्या पत्नी सातारा पोलीस असल्याचे समोर आले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर गांभीर्य ओळखून ठसे तज्ञ, फॉरेन्सिक टीम पाचारण करुन पंचनामा केला. यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाकडे हलवण्यात आला.
यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेवून त्यांच्याकडे कसून चौकशीला सुरुवात केली. हल्लेखोर कितीजण होते? हल्लेखोर कुठून आले? ते जाताना कसे गेले? घटनास्थळी आणखी काय पाहण्यात आले? याची पोलिसांनी माहिती घेत असून पुढील तपास सुरु आहे. गोळीबाराचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
युवकाचे अपहरण करून त्याचा खून केलेले संशयित 36 तासात रत्नागिरी येथून जेरबंद |
गर तू मेरा नही हो सका, तो किसी और का होने नहीं दूंगी... |
वाढे फाटा येथील मारेकरी ताब्यात; सूत्रधार कोण? |
दोन लाखांचे दागिने घेऊन कारागीर पळाला |
एकाची 35 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
टेस्टिंग सर्टिफिकेटच्या आमिषाने सुमारे 97 हजारांना गंडा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू |
दहावीतील मुलांनी धाक दाखवण्यासाठी चक्क क्लासमध्ये नेला कोयता |
राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा : पालकमंत्री शंभूराज देसाई |
हॉटेलमध्ये विसरलेले १४ तोळे दागिने मिळाले परत |
रेशनिंग दुकानदार केरोसिन परवानाधारक संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन |
कराडचा उड्डाणपूल पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील... |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
टेस्टिंग सर्टिफिकेटच्या आमिषाने सुमारे 97 हजारांना गंडा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू |
दहावीतील मुलांनी धाक दाखवण्यासाठी चक्क क्लासमध्ये नेला कोयता |
राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा : पालकमंत्री शंभूराज देसाई |
हॉटेलमध्ये विसरलेले १४ तोळे दागिने मिळाले परत |
रेशनिंग दुकानदार केरोसिन परवानाधारक संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन |
कराडचा उड्डाणपूल पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील... |
खानापूरच्या युवकाचा परखंदीत निर्घृण खून; वाई तालुक्यात खळबळ |
तांब्याच्या तारेची चोरी |
नोकरीच्या आमिषाने तब्बल चार लाख 99 हजाराची फसवणूक |
युवतीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल |
मध्यमवर्गीय, शेतकरी, गोरगरीबांना न्याय देणारा अर्थसंकल्प |