08:59pm | May 23, 2023 |
सातारा : सातारा नगरपरिषदेच्या हद्दवाढ भागातील सातारा विकास आघाडीने प्रस्तावित व शासनाकडून मंजूर करुन आणलेल्या विकास कामांपैकी बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत, तर काही विकासकामे प्रगतीपथावर आहेत. सुमारे 50 कोटींपेक्षा जास्त रक्कमेच्या विकासकामांमुळे, नागरीकांना रस्ते, गटर्स या मुलभुत सुविधांसह अन्य चांगल्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. सर्वसामान्य सातारकरांच्या विकासाकरीता सातारा विकास आघाडी कटीबद्ध आहे, अश्या शब्दात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या भावना, नागरीकांशी हितगुज तथा संवाद साधताना व्यक्त करतानाच, काम दर्जेदार आणि मुदतीत करत नसतील तर असा ठेकेदार मग तो कितीही मोठा आणि जवळचा असला तरी काळ्या यादीत टाका, असे ठणकावताना प्रशासनाला फटकारले आहे.
सातारा शहराच्या हद्दवाढ भागातील पूर्ण झालेल्या आणि सुरु असलेल्या विविध विकास कामांच्या निरिक्षण प्रसंगी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले अनौपचारीकरित्या बोलत होते. यावेळी सातारा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, ऍड.डी. जी. बनकर, किशोर शिंदे, वसंत लेवे, अशोक मोरे, सुनील काटकर, अरूण राजेभोसले, नगरअभियंता दिलीप चिद्रे उपस्थित होते.
यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नगरपरिषदेच्या अभियंत्यांसह, महादरे, धुमाळआळी-कुंभारवाडा रोड, अंबेदरे, शाहुपूरी -आझादनगर, मोळाचा ओढा, तामजाईनगर, दौलतनगर, स्व.दादामहाराज चौक (बॉम्बे रेस्टॉरंट चौक), यशोदा नगर, सन्मित्र कॉलनी, टेलिफोन ऑफिस-साईनगर, पेरेंटस् स्कूल, मंगळाई कॉलनी, रामराव पवार नगर, शिवप्रेमी कॉलनी येथील रस्ते, गटर्स, गार्डन, स्ट्रीट लाईटस्, पुलांचे रुंदीकरण इत्यादी विकासकामांचे निरिक्षण केले. सकाळी 8.00 वांजता सुरु झालेला पाहणी दौरा दुपारी 1.00 वांजता पूर्ण झाला. या वेळेत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्वत: प्रत्येक कामाची बारकाईने पाहणी तर केलीच, परंतु त्याचवेळी जेष्ठ नागरीक, महिला भगिनी आणि युवकांशी संवाद साधत वेगवेगळया प्रश्नांबाबत आस्थेवाईकपणे चर्चा केली.
शाहुपूरी येथील कामांची पाहणी करत असताना, शाहुपूरी पाण्याच्या टाकीमधुन दुषित पाणीपुरवठा होत असल्याची माहीती नागरीकांनी देताच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी लगेचच एमजेपीच्या अधिकार्यांसमवेत पाणीपुरवठा टाकीची पहाणी केली. त्यावेळी पाण्याला पिवळसर रंग असल्याचे दिसताच नागरीकांना शुध्द आणि स्वच्छ पाणीपुरवठा होण्याबाबत, जागेवरच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्यांची खरडपट्टी काढताना खडेबोल सुनावले. शाहुपूरी विशेष करुन शाहुनगर येथील परिसर डोंगर उताराचा असल्याने, पावसाळयात सुध्दा येथील रस्त्यांचे डांबर टिकले पाहीजे, कामे दर्जेदार झाली पाहीजेत, अश्या सक्त सूचना यावेळी त्यांनी केल्या.
दरम्यान खेळाचे मैदान म्हणून विकसित करण्यात आलेल्या जागेत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी फुटबॉल ला जोरदार किक मारुन, समाजकारण-राजकारणाबरोबरच खेळामध्येही आपल्याला विशेष रुची असल्याचे दाखवून दिले.
यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे ठिकठिकाणी आवर्जुन शाल व बुके देवून नागरीकांकडून उत्स्फुर्तपणे स्वागत करण्यात येत होते. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुढाकार घेतल्याने, सातारा विकास आघाडीच्या माध्यमातुन, आमच्या भागात पहिल्यांदाच डांबर पडले आहे, आता यंदाच्या पावसाळयापासून चिखल तुडवत जायला लागणार नाही अश्या पद्धतीच्या भावना देखील यावेळी काही महिला भगिनींनी बोलून दाखवत, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना धन्यवाद दिले.
आपल्या पाहणी दौर्यात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची वेगळी हटके स्टाईल पुन्हा एकदा प्रकर्षाने पहायला मिळाली. नागरीकांनी ऐनवेळी उपस्थित केलेल्या समस्यांवर अवाजवी आश्वासने न देता, जे होणार असेल तर कश्या पध्दतीने होईल हे देखिल यावेळी त्यांनी नमुद करीत सातारकर नागरीकांना आमच्या हृदयात स्थान आहे याचा परिचय दिला. यावेळी त्या-त्या भागातील नागरीक, कार्यकर्ते, महिला-भगिनी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |