09:30pm | Sep 23, 2021 |
सातारा : ज्वेलरी शॉपच्या उद्घाटना दिवशीच 1 लाख 86 हजार रूपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारणार्या पुण्याच्या दुकलीच्या लोणंद पोलीसांनी शिताफीने मुसक्या आवळल्या. लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व गणेश माने यांच्या टिमचे या घटनेमुळे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लोणंद येथील लक्ष्मी गोल्ड या नवीन ज्वेलर्स दुकानाच्या उद्घाटना दिवशीच अज्ञात जोडप्याने हातचलाखी करत एक लाख शहाऐंशी हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारून पोबारा केल्याची घटना घडली होती. याबाबत लोणंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल के. वायकर यांनी आपल्या सहकार्यांसह सीसीटीव्ही फुटेजचा माग काढत पुणे येथून जोत्स्ना सुरज कछवाय (वय 29, रा.आंबेगाव खु. पुणे) व निलेश मोहन घुते (वय 34, रा. गुजरवाडी फाटा, कात्रज पुणे) अशा संशयीत दोन सराईत भामट्यांना चोरीचा माल व चोरीसाठी वापलेली वॅगनर कारसहीत जेरबंद करण्यात यश मिळवले.
दुकान उद्घाटनाच्या दिवशीच घडलेल्या चोरीच्या घटनेने लोणंद पोलीसासमोर गुन्ह्याची उकल करण्याचे मोठे आवाहन उभे ठाकले होते. मात्र कर्तव्यदक्ष सपोनि विशाल वायकर व त्यांच्या पथकाने पुण्यातून या जोडीला जेरबंद केले. सातारा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे, फलटणचे उपविभागीय पोलीस अधीक्षकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक स्वाती पवार, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस नाईक संतोष नाळे, श्रीनाथ कदम, अभिजीत घनवट, फैय्याज शेख, अविनाश शिंदे, अमोल पवार, केतन लाळगे, गोविंद आंधळे तसेच महिला पोलीस अंमलदार वैशाली नेवसे, प्रिया नरुटे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |

सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |