04:14pm | Mar 18, 2021 |
पुसेगाव: पुसेगावातून जाणार्या सातारा-लातूर रस्त्याच्या काँक्रेटीकरण कामादरम्यान अडचणीचे ठरणारे रस्त्यालगतचे विद्युत खांब, झाडे, तसेच गावाला पाणीपुरवठा करणार्या पाइपलाइनचे व्हॉल्व्ह यांची पुसेगाव ग्रामपंचायत व मेगा इंजिनिअरींगचे प्रकल्प अधिकारी यांनी पाहणी केली.
गेली दोन वर्षे रखडलेल्या कामाला तातडीने सुरु करण्याची मागणी गेल्याच आठवड्यात ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार या कामात येँणार्या अडचणींची पाहणी प्रकल्प अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी सरपंच विजय मसणे, उपसरपंच पृथ्वीराज जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुरेशशेठ जाधव, गणेश जाधव, मधुकर टिळेकर, विशाल जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर प्रमुख राम जाधव, ग्रामविकास अधिकारी एन.एम.नाळे, तलाठी गणेश बोबडे, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी, वीज वितरण कंपनी चे कर्मचारी उपस्थित होते.
या राष्ट्रीय मार्गाचे काम येथील पब्लिक स्कुलच्या प्रवेशद्वारापर्यंत येऊन ते गेली दोन वर्षांपासून रखडले आहे. गावातील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. बर्याच ठिकाणी रस्त्यालगत गटारे नसल्याने पाणी रस्त्यावरून वाहते आहे. गावातून जाणारा रस्ता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कडेची गटारे होऊ शकत नाहीत. गावातील रस्त्याच्या काँक्रीटीकरणात पाणीपुरवठा करणार्या पाईप लाईन व व्हॉल्व्हचा, विद्युत खांब तसेच रस्त्यालगत असणारी झाडे काढण्याबाबत सूचना करण्यात आल्या. 9 मीटर रुंदीच्या या रस्त्याच्या दुतर्फा दीड मीटरची गटारे व त्याबाहेरील जागेत पाणीपुरवठा करणार्या जलवाहिन्या बसवण्यात येणार आहेत. प्रारंभी पब्लिक स्कुलचे प्रवेशद्वार ते पुसेगाव पोलिस ठाण्यापर्यंतच्या कामास प्रारंभ होणार आहे.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |