11:40pm | Aug 04, 2020 |
सातारा: सातारा जिल्हा रूग्णालयातील अनेक भानगडी चव्हाट्यावर येत असतानाच रविवारी रूग्णालयाच्या वॉर्ड क्र.5 मधील स्वच्छतागृहाच्या ड्रेनेजमध्ये 5 मानवी भ्रूण सापडल्यामुळे रूग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेला तीन दिवस उलटले तरी त्याबाबत कोणीही वाच्यता करण्यास धजावत नाही. वैद्यकीय अधिकार्यांकडूनच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याने एक प्रकारे वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासला जात आहे. दरम्यान, आणखी काही मृत अभ्रके सापडण्याची शक्यता रूग्णालयीन सूत्रांनी व्यक्त केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सातारा जिल्हा रूग्णालयातील स्वच्छता गृहाच्या ड्रेनेजची पाईप चोकअप झाल्यामुळे तो चोकअप काढण्यासाठी सफाई कामगारांना पाचारण केले होते. साधारणतः आठ दिवसांपूर्वी दुपारी हे काम सुरू असताना स्वच्छतागृहाच्या ड्रेनेजमध्ये तब्बल 5 मृत मानवी भ्रूण आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. ही सर्व भ्रूण सडलेल्या अवस्थेमध्ये सापडली आहेत. जिल्हा रूग्णालयात एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत मानवी भ्रूण आढळूनही रूग्णालय प्रशासनाने याबाबत कोठेही वाच्यता केली नाही. उलट ही माहिती माध्यमांना मिळाल्यानंतर माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ‘बातमी छापू नका’, ‘आमची नावे घेवू नका’ अशी आर्जव सुरू झाली. विशेष म्हणजे जिल्हा रूग्णायात 10 पेक्षा अधिक वॉर्ड असून हे सर्व वॉर्ड सध्या कोरोना सेंटर म्हणून ओळखले जातात. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढल्याने तेथील वैद्यकीय अधिकार्यांच्या मदतीसाठी खासगी वैद्यकीय अधिकार्यांची नेमणूक केली आहे. 24 तास या रूग्णालयात वैद्यकीय अधिकार्यांसह सर्वसामान्य नागरिकांचा वावर असतानाही एवढी मोठी घटना जिल्हा रूग्णालयाच्या प्रशासनाने दाबून का ठेवली याचे गौडबंगाल कळून येत नाही.
जिल्हा रूग्णालयात एक स्वतंत्र पोलीस चौकी असून गेल्या सहा महिन्यांत या चौकीतील रजिस्टरमध्ये अभ्रक पळवून नेले अथवा त्याचा मृत्यू झाला याबाबतची कसलीही नोंद नाही. मग हे सापडलेले भ्रूण या ठिकाणी कशी आली? ती नकुसा तर नाही ना? याबाबत काहीही माहिती उपलब्ध होवू शकली नाही.
जिल्हा रूग्णालयच तर नाही ना स्त्री भ्रूण हत्या केंद्र?
सातारा जिल्हा रूग्णालयात सोनोग्राफी मशीन आहे. महिलांच्या प्रसूतीसाठी दोन स्वतंत्र वॉर्ड आहेत. तर अर्भकांसाठी सुसज्ज अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या ठिकाणी प्रसूतीसाठी जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून महिला येत असतात. सध्या शासनाने गर्भलिंगनिदानावर बंदी घातली आहे. एवढ्या मोठ्या मृत भ्रूण संख्या पाहता जिल्हा रूग्णालयाचे प्रशासन संशयाच्या भोवर्यात सापडले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाचवेळी मृत भ्रूण सापडल्याने जिल्हा रूग्णालयच तर स्त्री भ्रूण हत्या केंद्र नाही ना? अशी शंकाच उपस्थित होवू लागल्या आहेत.
डॉ.गडीकर पुन्हा रडारावर
डॉ. आमोद गडीकर यांनी जिल्हा रूग्णालयाची सूत्रे स्विकारल्यानंतर आज अखेर रूग्णालयात अनेक भानगडी झाल्या. काही उघड झाल्या तर काही चव्हाट्यावर आल्या. मात्र जिल्हा रूग्णालयाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणावर मृत भ्रूण सापडणे ही पहिलीच घटना आहे. या घटनेच्या मुळाशी जायचे सोडून डॉ. गडीकर यांनी हे प्रकरण कस दाबलं जाईल. याकडेच अधिक लक्ष केंद्रीत केल्यामुळे ते पुन्हा एकदा रडावर येणार असल्याची चिन्हे आहेत.
‘ते’ व्हिडिओ आणि फोटो सातारा टूडेच्या हाती लागल्याने भांडाफोड
आठ दिवसांपूर्वी जिल्हा रूग्णालया मृत मानवी भ्रूण सापडल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. जिल्हा रूग्णालयातील वॉर्ड क्र.5 साठी असलेल्या स्वच्छतागृहाच्या ड्रेनेचे काम करताना 5 भ्रूण सापडली होती. परंतु या प्रकरणाची कोठेही वाच्यता करण्यात आली नव्हती. हा सारा प्रकार गेल्या आठ दिवसांपासून सफाईदारपणे गुप्त ठेवण्यात आला होता. परंतु सातारा टूडेच्या हाती या सार्या प्रकरणाचे फोटो आणि व्हिडिओ लागल्यानंतर या प्रकरणाचा भांडाफोड झाला. यातून अनेक धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |