मुंबई : रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज खेळणार्या भारतीय संघातील दोन माजी खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पाठोपाठ आता युसूफ पठाणलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचं शनिवारी रात्री समोर आलं. युसूफने स्वतः ट्विट करत याची माहिती दिली आहे. शनिवारी दुपारी सचिन तेंडुलकरला कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर रात्री युसूफने त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली.
शनिवारी (27 मार्च) रात्री साडेआठ वाजता युसूफ पठाणने ट्विट करून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला सौम्य लक्षणं आहेत. त्यामुळे मी घरातच क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. मी आवश्यक ती सर्व खबदरदारी आणि औषध घेतली आहेत. दरम्यान, माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी लवकरात लवकर कोरोना चाचणी करुन घ्यावी, अशी मी विनंती करतो, असं युसूफने ट्विट करून म्हटलं आहे.
सचिनने कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ट्विट करून माहिती दिली होती. तसंच आपण होम क्वारंटाइनमध्ये असल्याचंही सांगितलं होतं. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी मी नेहमीच सर्व नियम पाळत काळजी घेत होतो. तसेच मी अनेकदा चाचण्याही केल्या होत्या. मात्र आज माझी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला मध्यम स्वरुपाची लक्षणं दिसत आहेत. मी स्वत:ला घरीच क्वारंटाइन केलं आहे. तसंच डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सूचनांचं मी पालन करत आहे. मला आणि देशातील अनेकांना पाठिंबा देणार्या आरोग्य सेवेतील सर्वांचे मी आभार मानतो, असं सचिन म्हणाला होता.
सचिन तेंडुलकरबरोबरच युसूफ पठाणही रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये खेळला होता. या स्पर्धेत दोघांनी जबरदस्त फलंदाजी केली होती. दोघांनीही इंडिया लिजेंड्सला संपूर्ण स्पर्धेत सामने जिंकवून देण्यात मोलाची भूमिका पार पाडली. या स्पर्धेत इंडिया लिजेंड्स संघाकडून सचिनने सर्वाधिक धावा केल्या आहेत. या स्पर्धेत भारतीय संघाने श्रीलंकेला 14 धावांनी हरवून चषकावर नाव कोरलं.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |