01:45pm | Mar 24, 2021 |
पुसेगाव: पुसेगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे, कला व वाणिज्य महाविद्यालयाचे नॅक समितीकडून दि.3 मार्च 2021 व 4 मार्च 2021 रोजी महाविद्यालयाच्या नॅक निकषांची पाहणी केली. त्यानुसार
महाविद्यालयास नॅक कडून 2.98 CGP बी++ ग्रेड प्राप्त झाल्यामुळे पुसेगाव येथील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टतर्फे कला व वाणिज्य महाविद्यालय, पुसेगावचे प्राचार्य डॉ.कैलास जगदाळे यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता.
पुढे आपल्या भाषणात प्राचार्य डॉ.कैलास जगदाळे म्हणाले, पुसेगाव पंचक्रोशीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना ज्या शैक्षणिक सुविधांची आवश्यकता असेल त्या शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी महाविद्यालय सततच कटिबद्ध राहील, असे आश्वासन दिले. नजिकच्या काळात महाविद्यालय विज्ञान शाखा सुरू करण्यासाठी
महाविद्यालय शासनस्तरावर व रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रयत्नशील राहील. पुसेगाव येथील ग्रामस्थ, पालक यांच्या सहकार्याची आम्हास नितांत गरज आहे.
महाविद्यालयाच्या नॅक कामकाजासाठी श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टने रुपये दोन लाख देणगी दिल्याबद्दल चे ट्रस्टचे सर्व विश्वस्त यांचे आभार मानले. रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळे महाविद्यालयास बी++ मानांकन प्राप्त झाले असे म्हणाले.
राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश जाधव म्हणाले, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून महाविद्यालय स दोन लाखांची देणगी दिल्यामुळे नॅकच्या कामकाजास आर्थिक मदत झाली. नॅककडून महाविद्यालयास बी++ग्रेड प्राप्त झाल्यामुळे हे महाविद्यालय एक आदर्श महाविद्यालय झाले आहे. व महाविद्यालयाचा चेहरामोहरा बदलला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संजय क्षीरसागर यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन मोहनराव जाधव, डॉ.सुरेश जाधव. श्री सुंदरगिरी महाराज, विशाल जाधव, प्राचार्य डॉ.कैलास जगदाळे, प्रा. प्रतिभा जगदाळे, प्रा.डॉ.कांबळे. बी.बी.,प्रा.डॉ. भारत खिलारे, प्रा.डॉ. किशोर गाढवे, प्रा.शहाजी माळी, प्रा.पवार एल.के., प्रा.हनुमंत निमसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा.माळी यांनी मानले.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |