अजित जगताप
सातारा : सध्या कोरोना संसर्ग इतकेच घातक समाजमाध्यम ठरू लागले आहे. एक व्हिडिओ ने वायरमनला पुन्हा शॉक दिला. समाज माध्यमातून हा व्हिडीओ व्हायरल झाला. त्या वायरमनला सुध्दा नवल वाटले. हा व्हिडिओ पाहताना अनेकांच्या छातीत धस्स होत आहे.
याबाबत माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी एका वायरमनाला डीपी दूरस्त करताना शॉक लागला होता. त्यावेळी तातडीने विद्युत यंत्रणा बंद करण्यात आली होती. तारांना चिकटून वायरमन तेथेच निपचीत पडले होते. हा व्हिडिओ पुसेगाव महावितरण कार्यालयातील वायरमन महादेव वाघ (रा. मोळ, ता. खटाव) यांचा होता. या अपघातात ते जखमी झाले असून उपचारानंतर पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कामावर रुजू झाले आहेत.
सुमारे एक महिन्यांपुर्वी पुसेगाव हद्दीतील पुसेगाव-वडूज रस्त्यावर येथील शंकर पार्वती सर्व्हिसिंग सेंटर येथील सिंगल फेज डीपी वरील दुरुस्ती करताना हा अपघात झाला होता.
व्हिडिओमधील घटना सत्य असली तरी त्याचा कालावधी जुना होता. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणतीही खातरजमा न करता अनेकांनी आपल्या बुद्धीचा पुरवठा तसाच सुरू ठेवला होता. त्यामुळे सदर घटना ताजी घडल्याचे समजून काहींनी दिवसभर विचारणा केली. दरम्यान वायरमन वाघ यांनी मी ठणठणीत असून पुन्हा कामावर हजर झालो आहे, असे सांगतच आपली काळजी सर्वजण करीत आहेत. याचा अनुभव घेतला.
सध्या लॉक डाउन व घरोघरी मोबाईलचे जाळे निर्माण झाले आहे. महत्वाच्या कामांचा वेळी नेट मिळत नाही. काहीवेळा रेंज नसते. अशावेळी फालतू व खात्री न करता मेसेज फॉरवर्ड करणारे आपल्याकडे माहितीचा संग्रह आहे, हे दाखविण्याचा अयशस्वी प्रयत्न करतात. त्यांच्यामुळे इतरांनाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच युट्युब चॅनलने तर सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. हा आता चिंतेचा विषय ठरला आहे, अशी प्रतिक्रिया उमटू लागली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |