04:58pm | Nov 28, 2020 |
सिडनी : ऑस्ट्रेलिया विरूध्दच्या पहिला सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू मायकल होल्डिंग यांनी विश्लेषण केलं आहे. त्यांच्या मते भारतीय संघात धोनी नसल्यामुळेच भारतीय संघाला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना अवघड जात आहे. भारतीय संघाला भविष्यातही काही काळ धोनीच्या अनुपस्थितीचा फटका बसणार आहे, असही मायकल होल्डिंग यांनी म्हटले आहे. होल्डिंग आपल्या यु-ट्यूब चॅनलवरील कार्यक्रमात बोलत होते.
भारतीय संघाच्या पहिल्या सामन्यातील कामगिरीबद्दल बोलत असताना वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू मायकल होल्डिंग यांनी विश्लेषण केलं आहे. माझ्या मते भारतीय संघाला अजुनही धोनीची उणीव भासते आहे. यापुढे भारतीय संघाला धावसंख्येचा पाठलाग करणं नेहमी कठीण जाणार आहे. धोनीचा संघात नसल्याचा हा मोठा फटका भारतीय संघाला बसणार आहे. धावसंख्येचा पाठलाग करताना मधल्या फळीत येऊन डाव सावरण्याचं कसब धोनीकडे होतं. ज्यावेळी धोनी संघात होता त्यावेळी भारताने यशस्वीरित्या धावसंख्येचा पाठलाग केला आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 375 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात आश्वासक झाली. शिखर धवन आणि मयांक अग्रवाल यांनी पहिल्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. हेजलवूडने अग्रवालला माघारी धाडत टीम इंडियाला पहिला धक्का दिला, त्याने 22 धावा केल्या. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यरही ठराविक अंतराने माघारी परतले. एका क्षणाला टीम इंडियाची अवस्था 3 बाद 80 अशी होती. यानंतर भरवशाच्या लोकेश राहुलनेही निराशा करत माघारी परतण पसंत केलं. 4 बाद 101 अशा संकटात सापडलेल्या टीम इंडियाला अखेरीस शिखर धवन आणि हार्दिक पांड्या यांनी सावरलं. दोन्ही फलंदाजांनी पाचव्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी केली.
दरम्यान, लॉकडाउनपश्चात तब्बल 8 ते 9 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला पहिला वन-डे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. या सामन्यात भारतीय संघाला 66 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी पहिल्या डावात अतिशय निराशाजनक कामगिरी केली. फलंदाजीतही हार्दिक पांड्या आणि शिखर धवन यांचा अपवाद वगळता अन्य सर्व फलंदाज अपयशी ठरले.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |