03:20pm | Sep 26, 2020 |
दहिवडी: तालुक्यात महावितरण विभागाचे खासगी ठेकेदार हे जमिनीचे मालक झाले आहेत का? कोणालाही न विचारता हजारो शेतकर्यांच्या शेतातून महावितरण विभागाचे खासगी ठेकेदारांनी पोल उभे केले आहेत व तारा ओढल्या आहेत. हे तातडीने थांबवा अन्यथा महावितरण विभागाचे कार्यालय फोडू असा इशारा ग्राहक प्रबोधन समितीचे तालुकाध्यक्ष राजू मुळीक यांनी दहिवडी येथील पत्रकार परिषदेत दिला आहे.
एचव्हीडीएस योजना अंतर्गत माण-खटाव तालुक्यातील चालू असलेल्या आयुष्य इलेक्ट्रिकल व विक्रान कंपनीच्या ठेकेदारांचा मनमानी कारभार सुरू असून हजरो शेतकरी वर्गाच्या शेतातून न विचारता पोल तसेच जनित्र उभी केली आहेत. तसेच अजूनही उभे करत आहेत. यांना तात्काळ सूचना देण्यात याव्यात तसेच 2013 साली मंजूरी असणार्या जाधववाडी प्रकल्पाला 2015 मध्ये पूर्ण करण्याचे आदेश महावितरण विभागाने दिले होते मग ते पूर्ण का करता आले नाही? तसेच ते काम अर्धवट ठेवून त्या कामाचे जोड शिंगणापूर रस्त्यालागत जुन्या लाईनवरती का देण्यात आला आहे. तो देखील अनधिकृतपणे का दिला आहे. एवढं सावळा गोंधळ होत असताना देखील महावितरण विभागाचे दहिवडी उपविभागीय उपकार्यकारी अभियंता, तसेच वडुज विभागाचे अभियंता हे डोळे बंद करून का बसले आहेत. याची देखील चौकशी करण्यात यावी अन्यथा महावितरण विभागाला याचे गंभीर परिणाम सोसावे लागतील, असा इशारा देखील मुळीक यांनी दिला आहे.
तालुक्यातील राजकीय ताकद वापरुन हा उपद्व्याप केला जात आहे. हजारो शेतकर्यांच्या शेतातून पाहिजे असे सोईस्कर पोल उभे करुन तारा ओढल्या आहेत. यांची कल्पना कोणत्याच शेतकर्याला कशी दिली गेली नाही..? ठेकेदाराने कोणत्याही विभागाची परवानगी न घेता पोल लावले कसे... ? अनेक ग्रामपंचायत तसेच दहिवडी नगरपंचायत यांची परवानगी घेणे गरजेचे होते. मात्र त्या देखील घेतल्या गेल्या नाहीत.
ठेकेदाराने राजकीय ताकद वापरुन अनेक अधिकारी तसेच नेते मंडळी हाता खाली घेऊन हे उद्योग केले आहेत. ते ताबडतोब थांबवा अन्यथा आम्ही सर्व शेतकर्यांच्या शेतातील पोल पाडणार आहोत. याची जबाबदारी संबंधित ठेकेदारांची राहील. न विचारता ही काम केले आहेत त्याचे नुकसान देखील त्यांची जबाबदरी राहील, असे ग्राहक प्रबोधन समिती चे तालुकाध्यक्ष राजू मुळीक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |