03:17pm | Aug 08, 2022 |
बर्मिंगहम : भारताची अव्वल बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधूने दमदार कामगिरी करत भारताला सुवर्णपदक जिंकवून दिले. यापूर्वी सिंधूने २०१४ साली राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. तर २०१८ साली रौप्यपदकाची कमाई केली होती. त्यामुळे तिचे हे राष्ट्रकुलमधील पहिले सुवर्णपदक होते. या सामन्यात पहिला गेम सिंधूने २१-१५ असा जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या गेममध्येही तिने दमदार कामगिरी केली आणि जेतेपद पटकावले.
सिंधूला पहिला पॉइंट घेता आला नसला तरी तिने यावेळी पहिल्या गेममध्ये आघाडी घेतली होती. सिंधूने त्यानंतर १-१ अशी बरोबरी केली. त्यानंतर सिंधूने ३-१ आणि ४-२ अशी आघाडी कायम ठेवली होती. पण त्यानंतर मिचेलने काही पॉइंट्स कमावत सिंधूच्या जवळ येण्याच्या प्रयत्न केला होता. पण सिंधूने तरीही ७-६ अशी आघाडी ठेवली होती. त्यानंतर सिंधूने आक्रमक खेळ केला आणि १५-९ अशी मोठी आघाडी पहिल्या गेममध्ये मिळवली होती. सिंधूने ही आघाडी १९-१५ अशी वाढवली आणि त्यानंतर पहिला गेम जिंकला.
सिंधूचा सामना हा कॅनडाच्या मिचेल लीबरोबर होणार होता. यापूर्वी सिंधूने सिंगापूर आणि मलेशियाच्या खेळाडूंना पराभूत केले होते. त्यामुळे तिच्याकडून यावेळी सुवर्णपदकाची अपेक्षा होती. सध्याच्या घडीला सिंधू ही चांगल्या फॉर्मात आहे. कारण या स्पर्धेपूर्वी सिंधूने सिंगापूर खुली स्पर्धा जिंकली होती. त्याचबरोबर यावेळी राष्ट्रकुल स्पर्धेत ध्वजवाहक होण्याचा दुसऱ्यांदा मानही सिंधूला मिळाला होता. या स्पर्धेत भारताच्या संघाकडून खेळताना सिंधूने चांगली कामगिरी केली होती. सिंधूने विजय मिळवला असला तरी भारताला बॅडमिंटनच्या सांघिक प्रकारात विजय मिळवता आला नव्हता.
सिंधू आणि लक्ष्य सेनने शनिवारी जिंकली होती उपांत्य फेरी
ऑलिम्पिक पदकविजेत्या सिंधूने उपांत्य फेरीत मलेशियाच्या जिया याव मिनवर सलग दोन सेट्समध्ये विजय मिळवत महिला एकेरीची फायनल गाठली. तर लक्ष्य सेनने अटीतटीच्या सामन्यात सिंगापूरच्या जिया हेंगचं आव्हान मोडीत काढलं. पण पुरूष एकेरीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात किदंबी श्रीकांतला मलेशियन प्रतिस्पर्ध्याकडून पराभव स्विकारावा लागला. २७ वर्षीय पिव्ही सिंधूने तिच्या अनुभवाच्या जोरावर सिंगपूरच्या येओ जिया मिनलवर ४९ मिनिटांच्या लढतीत २१-१९, २१-१७ असा दमदार विजय साकारला. सिंधूने २०१८ आणि २०१४ च्या स्पर्धेमध्ये एक रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावले होते. या खेळात देखील सिंधूने आपली पकड मजबूत ठेवली होती. बॅडमिंटनमध्ये जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या सेनने सिंगापूरच्या जिया हेंग तेहविरुद्ध वर्चस्वपूर्ण सुरुवात केली. मात्र, सेनने पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत २१-१०, १८-२१,२१-१६ असा विजय मिळवला. सेन म्हणाला की, "मी दुसर्या सामन्यात मला खेळ नीट जमत नव्हता. पण मी शेवटी नीट खेळण्यात यशस्वी ठरलो. पहिल्या गेममध्ये प्रेक्षकांच्या पाठिंब्याने ही खूप मदत केली".
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |