04:20pm | Apr 30, 2021 |
मुंबई : अखेर अवघ्या चारच दिवसात महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा शरीरसौष्ठवपटू जगदीश लाड करोनाविरूद्धचे आव्हान परतवण्यात अपयशी ठरला. हजारो तरूणांना फिटनेसचे धडे देणार्या जगदीशचे अवघ्या 34 वर्षी निधन झाल्यामुळे भारतीय शरीरसौष्ठव जगताला जबर धक्का बसला आहे. त्याच्या अकस्मात निधनाबाबत क्रीडा विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पीळदार आणि आखीवरेखीव शरीरयष्टीने तगड्या प्रतिस्पर्ध्यासमोरही जबरदस्त आव्हान उभं करणारा जगदीश भारतातील टॉप टेन शरीरसौष्ठवपटूंमध्ये गणला जायचा. त्याने नवी मुंबई महापौर श्री, नवी मुंबई श्री या प्रतिष्ठेच्या किताबासह भारत श्री आणि महाराष्ट्र श्री या स्पर्धेत 90 किलो वजनी गटात तीन-तीन वेळा सुवर्ण पदक विजेती कामगिरी केली. जागतिक स्पर्धेत दोन रौप्य पदके त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
मूळचा सांगलीच्या पलूस तालुक्यातील पुंडल गावच्या जगदीशने आपल्याच उंचीच्या मि. युनिव्हर्स प्रेमचंद डेगरांना आदर्श मानून वयाच्या अठराव्या वर्षी जिममध्ये घाम गाळायला सुरूवात केली. या खर्चिक खेळात प्रारंभी त्याचा निभाव लागत नव्हता. म्हणून त्याने फिजीकल ट्रेनर म्हणून अनेक प्रतिष्ठीत लोकांना मार्गदर्शन करायला सुरूवात केली आणि त्यातून मिळणार्या उत्पन्नातून त्याने आपल्या शरीरसौष्ठवाला आणखी पीळदार केले. अत्यंत संस्कारी आणि मितभाषी असणारा जगदीश अनेक स्पर्धांत विजेता असूनही उपविजेता ठरायचा. या पक्षपाती निर्णयामुळे तो कधीच खचला नाही किंवा कधीही त्याने संघटकांकडे आंकाडतांडव केले नाही. फक्त तो विचारायचा की मी कुठे कमी पडलो. जगदीशने कधीच हार मानली नाही. त्याला आपल्या मेहनतीवर प्रचंड विश्वास होता. त्याला हेमंत खेबडे, पणिकर सर, विकास माने या लोकांनी चांगले मार्गदर्शन केले.
शरीरसौष्ठवात टिकायचं असेल तर स्वताचा व्यवसाय असायला हवा. स्वताची जिम असायला हवी. नवी मुंबईतही एक अत्याधुनिक जिम सुरू करण्याचे त्याचे प्रयत्न सुरू होते तेव्हाच त्याला अहमदाबाद येथून लाईफ फिटनेस या जिमचे व्यवस्थापन सांभाळायची ऑफर आली. त्याने ही ऑफर स्वीकारली आणि तो दोन वर्षांपूर्वीच आपल्या बायको-मुलीसह अहमदाबादला स्थायिक झाला. त्याची जिमही चांगली सुरू होती. पण गेले वर्षभर करोनाचा फटका या व्यवसायालाही बसला होता. पण लाइफ फिटनेसचे मालक जगदीशच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. त्याच्या निधनामुळे या सर्वांनाही जबर मानसिक धक्का बसला असून करोनाविरूद्धच्या लढाईत तो अवघ्या चार दिवसांतच हरला. त्याचं जाणं सर्वांनाच चटका लावून गेलं आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |