09:43pm | Apr 14, 2021 |
फलटण : मौजे सासकल येथील ग्रामसेवक अंगराज जाधव गेल्या पाच वर्षांपासून मौजे सासकल येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असून विविध शासकीय योजनांच्या निधीमध्ये अनियमितता व कामकाजामध्ये ढिसाळपणा करत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
आठवड्यातील ठरलेल्या वारी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये न येणे, आलेल्या लोकांना अरेरावीची भाषा वापरणे, ग्रामस्थांशी उद्धटपणे बोलणे, ग्रामपंचायतीसाठी आलेल्या विविध प्रकारच्या निधीचा अपहार करणे, लोकांनी केलेल्या फोनला उत्तर न देणे, ग्रामस्थांचे फोन ब्लॅक लिस्टमध्ये टाकणे या व अशा विविध तक्रारी ग्रामस्थ करत आहेत. नुकतेच चौदाव्या वित्त आयोगातून मागासवर्गीय समाजमंदिराच्या दुरूस्तीवर १ लाख ६५ हजारच्या जवळपास रक्कम खर्च करून या निधीमध्ये अपहार केल्याची ग्रामस्थांनी तक्रार केली आहे. वास्तविक पाहता मागासवर्गीय समाजाची कोणत्याही स्वरुपाची मागणी या इमारतीसाठी नसताना त्यावर एवढी मोठी रक्कम खर्च करण्यात आलेली आहे. यासंबंधी ग्रामस्थांनी सरपंच ग्रामपंचायत सायकल व गटविकास अधिकारी फलटण यांच्याकडे तक्रार दिलेली आहे. अजून यावर कोणत्याही स्वरूपाची चौकशी किंवा कारवाई करण्यात आली नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गेल्या पाच वर्षांत ग्रामपंचायतीच्या वतीने विविध योजनांच्या अंतर्गत खर्च करण्यात आलेल्या निधीबाबत दिनेश दत्तात्रय मुळीक यांनी तोंडी माहिती विचारली असता माहिती देणार नाही असे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. या संदर्भात १५/०२/२०२१ ला मोनाली दिनेश मुळीक यांनी माहिती अधिकाराखाली गेल्या पाच वर्षांतील विविध कामांची व निधीच्या खर्चाविषयी माहितीची मागणी केलेली होती. परंतु एक महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटला तरी यावर कोणत्याही स्वरूपाची माहिती ग्रामसेवक यांनी दिली नाही. त्यामुळे मोनाली दिनेश मुळीक यांनी ०१/०४/२०२१ रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती फलटण यांच्याकडे या संदर्भात अपील दाखल केले आहे. दिनेश दत्तात्रय मुळीक यांनी ही बाब आमदार दीपक चव्हाण यांच्या नजरेस आणून दिल्यानंतर त्यांनी ग्रामसेवकांना योग्य ती माहिती देण्याचा आदेश दिलेला असताना आजतागायत ग्रामसेवकांनी माहिती दिलेली नाही. याउलट दिनेश दत्तात्रय मुळीक यांच्या वृक्ष संगोपन या कामांच्या संदर्भात वरिष्ठांकडून तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे सदर ग्रामसेवकांच्या कामाची वरिष्ठांमार्फत चौकशी व्हावी व त्यांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मौजे सासकल येथील मागासवर्गीय समाजमंदिराच्या दुरुस्तीमध्ये झालेल्या अपहाराबाबत सासकल जनआंदोलन समिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहेत, असे जनआंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |