09:03pm | Jan 31, 2023 |
कराड : आंबोली घाटातील खोल दरीत युवक कोसळल्याचा बनाव अखेर उघड झाला असून हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावताना संशयित आरोपीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर हा बनाव उघड झाला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आलेली व्यक्तीच दरीत कोसळल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले. अशारितीने दरीतील दोन मृत्यूंचे गूढ अखेर उघड झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आंबोली घाटातील खोल दरीत कोसळून युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दरीत कोसळलेल्या युवकाचा शोध सुरू केला. त्यावेळी पोलिसांना दोन मृतदेह सापडले. त्यामुळे दुसरा मृतदेह कुणाचा याचा पोलिस शोध घेत असतानाच त्यांना मृत युवकाच्या मित्रावर संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली. यावेळी एकाची हत्या करून तो मृतदेह दरीत टाकण्यासाठी आलो असताना माझ्यासोबतच्या मित्राचा पाय घसरून तो दरीत कोसळला आणि त्याचा देखील मृत्यू झाला, अशी माहिती मृत युवकाच्या मित्राने पोलिसांनी दिली. त्यामुळे दरीतील दोन मृतदेहांचं गूढ अखरे उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत युवकांच्या मित्राला ताब्यात घेतलं आहे.
कराडमधील वीट व्यवसायिकाला कामगार पुरवतो, असे सांगून एकाने कराड येथील एकाकडून पैसे घेतले. परंतु संबंधित व्यक्तीने कामगार पुरवले नाहीत. शिवाय पैसे देखील परत दिले नसल्याने त्याला दोघांनी गाडीत घालून मारहाण केली. परंतु मारहाण केलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. हा मृतदेह आंबोली दरीत टाकण्यासाठी सोमवारी रात्री आंबोली जवळील मुख्य धबधब्याजवळ हे दोघेजण आले. मृतदेह खोल दरीत फेकण्यासाठी दोघेही कठड्यावर उभे राहिले. यावेळी यातील एकजण मृतदेहासोबत दरीत कोसळला आणि त्याचाही मृत्यू झाला. त्यांनतर सोबत असलेला एकजण तिथेच रात्रभर गाडीत बसून राहिला.
दुपारी पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्याने पोलिसाना घडलेली घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून मृत युवकांच्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |