05:26pm | Oct 21, 2020 |
सातारा: माण, खटाव तालुक्यातील चारा छावणी खोटाळा प्रकरणी तसेच वाळू उपसा प्रकरणी वारंवार निवेदने देवूनही या गंभीर प्रकरणांची दखल घेतली जात नाही. याबाबत तात्काळ कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय भोसले यांनी दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, माण- खटावच्या उपविभागीय कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. माण-खटावमधील चारा छावणीमधील भ्रष्टाचाराची चौकशी वरिष्ठ कार्यालयामार्फत करण्यात यावी, तसेच तालुक्यात सुरू असलेल्या वाळू उपसाप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. याबाबत अनेकदा मागण्यांचे निवेदनही देण्यात आले आहे. परंतु या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने आज शिवसेनेतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती श्री. भोसले यांनी दिली.
तालुक्यात झालेल्या चारा छावणी भ्रष्टाचारप्रकरणी तसेच वाळू उपसा प्रकरणी अनेकदा पत्रव्यवहार केला आहे तसेच पुरावेही सादर करण्यात आले आहेत. परंतु या कडे दुर्लक्ष केले जात असल्याने आता कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळी जिल्हाध्यक्ष संजय भोसले यांनी दिला.
या ठिय्या आंदोलनावेळी जिल्हाध्यक्ष संजय भोसले यांच्यासह माण- खटाव मधील शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |